बहुतांशी लाेक खाण्याच्या वेळेसाठी काेणत्याही नियमाचे पालन करत नसतात. त्यांचा असा समज असताे की भूक जेव्हा लागेल तेव्हा खाऊन घेऊयात.काय तुम्हाला हे माहिती आहे काय की वारंवार खाणे, खाण्याची काेणती निश्चित वेळ नसणे, तसेच लंच आणि डिनरमध्ये काहीही खाणे अशा सवयी तुमचे आराेग्य बिघडवू शकतात? तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी उठून दाेन तासांच्या आतच सकाळचा नाष्टा करून घेतला पाहिजे आणि रात्री आठ वाजण्या आधीच जेवून घेतले पाहिजे.
भाेजनाच्या याेग्य टाईमाबराेबरच खाण्यात काय असावे तेही महत्त्वाचे आहे. व्यस्त दिनचर्येमुळे नाष्टा मीस करणे, दिवसभर उपाशी राहून फक्त लंच किंवा डिनर करणे. सकाळी लवकर उठून नाष्टा करावा आणि दिवसाची सुरुवात चहा किंवा काॅफी ऐवजी दूध, ओट्स, ब्रेड किंवा सिझनल फळाने करावी. सकाळच्या नाष्ट्यात आणि दुपारच्या जेवणा दरम्यान पाच तासांचे अंतर असायला पाहिजे. परंतु, व्यस्त दिनचर्येमुळे लाेक वरील गाेष्टींकडे दुर्लक्ष करतात. रात्री उशिरा जेवणे हे शरीराच्या आराेग्यासाठी याेग्य नाही! भाेजन केल्याकेल्या लगेचच झाेपी जाऊ नये.
रात्रीचे भाेजन आणि झाेपण्यामध्ये कमीत-कमी तीन तासांचे अंतर असले पाहिजे. रात्री जाग आल्यास जर भूक लागली असेल, तर काही खाल्ले नाही पाहिजे. कारण हेच आहे की त्यामुळे डायबिटीस, हायपरटेंशन, लठ्ठपणा, निद्रानाश इत्यादीं सारख्या समस्या निर्माण हाेतात. तसेच लेट खाल्ल्याने खाल्लेले पचत देखील नाही, त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटी हाेते!