दैनंदिन आयुष्यामध्ये भाजी किंवा वरणाला फाेडणी द्यायची असेल किंवा चपात्या, भाकऱ्यांची कणिक मळायची असेल; तर या सगळ्याच पदार्थांमध्ये तेलाचा वापर आपण करत असताे. त्या व्यतिरिक्तही सॅलड ड्रेसिंगमध्ये, तळण्यासाठी, लाेणच्यांमध्ये या सगळ्याच पदार्थांमध्ये तेल असते. आपल्या डाएटमध्ये याेग्य प्रमाणात तेलाचा समावेश करणे फारच आवश्यक आहे.
सामान्यतः बऱ्याच घरांमध्ये एकाच प्रकारच्या तेलाचा वापर हाेत असताे.
जर त्याऐवजी आपण विविध प्रकारच्या तेलांचा वापर केल्यास त्यापासून शरीराला अनेक प्रकारे फायदे पाेहचू शकतात. इथे हेही लक्षात ठेवावे की तेलाचा वापर करण्याची देखील एक रीत असते. काही तेलांचा वापर सॅलडमध्ये किंवा हलक्या आचेवर काही पदार्थ हलवायचे असतील, त्यामध्येच हाेऊ शकताे. त्यांचा वापर तुम्ही डीप फ्राय करण्यासाठी करू शकत नाही. तुम्हाला काेणत्या तेलाचा वापर कशा प्रकारे करायचा? याची माहिती नसली तरी देखील शरीराला नुकसान हाेऊ शकते. न्यूट्रिशनिस्ट भावी माेदी यांच्याकडून त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊयात की आहारामध्ये कुठल्या प्रकारची तेलं कशा प्रकारे वापरली पाहिजेत, ज्यामुळे शरीराला त्यांचा महत्तम फायदा मिळेल. तेल खाणे का आवश्यक? तेल एक प्रकारचे फॅट असतात.
सामान्यपणे फॅटचे नाव ऐकून लाेक घाबरतात. त्याच्या डाेक्यात मेदस्वीता आणि काेलेस्ट्राॅलची इमेज येते.
आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की फॅट आपला शत्रू नाही. ते एक आवश्यक न्यूट्रिअन्ट आहे, ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. आपल्याला कुकिंग ऑइल, नट्स आणि सीड्स, डेअरी-प्राेडक्ट्स इत्यादींपासून फॅट मिळतात.
शरीरामध्ये काही व्हिटॅमिन्स जसे की ए, डी, इ, के फॅट साेल्युबल आहेत.म्हणजेच हे व्हिटॅमिन्स शरीरामध्ये तेव्हाच अॅबसाॅर्ब हाेतात जेव्हा खाण्यामध्ये फॅट असतात. या व्हिटॅमिन्सला फॅटशिवाय घेण्यात आल्यास, शरीर त्यांना नीटपणे अॅबसाॅर्ब करत नाही. परिणामी शरीराला त्याचा फायदा मिळत नाही. फॅट हार्माे न - प्राेडक्शनसाठीही जरुरीचे आहे.
एस्ट्राेजन, प्राेजेस्टेराॅन यांसारखे हार्माे नचा बेझ काेलेस्ट्राॅल असतात जे हेल्दी फॅटपासून बनतात. शरीरात फॅटची कमतरतेमुळे हाॅर्माेनल इम्बॅलन्स हाेऊ शकते आणि इरेग्युलर पिरियड, मूड-स्विंग्स, त्वचा-केसांच्या समस्या, फर्टिलिटीच्या समस्या इत्यादी हाेऊ लागतात. फॅट डायजेस्टिव्ह सिस्टमचे सेफ्टीवाॅल मजबूत करण्याचे काम करतात. त्याच बराेबर आतड्यांमध्ये जर जळजळ हाेत असेल तर ते कमी करण्यात मदत करतात. याशिवाय आपले जे दुसरे अवयव असतात त्यांनाही फॅटची आवश्यकता असतेच. शरीरात फॅटची कमतरता असेल, तर मेंदू, ह्रदय, लिव्हर नीटपणे काम करू शकत नाहीत. केस आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात, पचन नीट हाेत नाही, तसेच इम्यूनिटीही घटते. वजन घटवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लाेकांनीही थाेड्या प्रमाणात फॅट घ्यायलाच पाहिजे.
फॅट पचायला वेळ लागताे म्हणून फॅट जास्त वेळेपर्यंत पाेट भरलेले ठेवण्याचा फील करवून देतात.
कशा प्रकारे वापर करावा ? डेली कुकिंगमध्ये तुम्ही शेंगदाणा ऑइल किंवा सनफ्लाॅवर ऑइल वापरत असाल तर लाेणच्यांमध्ये किंवा घरी एखादी पंजाबी भाजी बनवाल त्यामध्ये माेहरीचे तेल वापरावे. सॅलड ड्रेसिंगमध्ये ऑलिव्ह ऑइल वापरावे. याशिवाय हल्ली अॅव्हाकाडाे ऑईल, फ्लॅक्स सीड्स तेल, अखराेटचे तेल मिळते; पण या पदार्थांना ऑइलच्या रूपात खाण्याऐवजी त्यांना जसेच्या तसे डायरेक्ट भाजून खाल्ल्यास चांगले! बाकी सामान्यतः फ्लॅक्स सीड्स तेल आणि अखराेटचे तेल हीट- सेन्सिटिव्ह असते, म्हणून तुम्ही त्यांना गरम करू शकत नाही.
सॅलड, दही, स्मूधीमध्ये मिक्स करून किंवा चपातीवर थाेडेसे तुपासारखे लावून खाऊ शकता. अॅव्हाकाडाे ऑईलला सॅलडमध्ये टाकून किंवा खिचडीवर टाकून खाऊ शकता किंवा मग बेकिंग किंवा पनीर सारख्या भाज्यांना थाेडे फ्राय कारण्यासाठी वापरू शकता. परंतु, ही सगळी तेलं भारतीय किचनमध्ये लाेक सहजपणे वापरत नाहीत. शिवाय ती व्यापकपणे उपलब्ध देखील नाहीत आणि महागही आहेत.
काेणत्या प्रकारचे तेल खावे? आपल्या डाएटमध्ये विविध प्रकारच्या तेलांचा वापर केला पाहिजे, कारण की सगळ्यांमध्येच स्वतःचे वेगळे गुण असतात आणि त्यांमुळे शरीराला लाभ हाेताे. चणऋ म्हणजेच माेनाे अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स ज्यांत ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल, माेहरी तेल, अॅव्हाकाडाे तेल वगैरेंचा समावेश हाेताे. अशाच प्रकारे, झणऋ म्हणजे पाॅली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् ज्यांत फ्लॅक्स सीड्स तेल, अखराेटचे तेल, सूर्यमुखीच्या तेलांचा समावेश हाेताे. चणऋ हार्ट - हेल्थ आणि हाॅर्माे न - हेल्थसाठी चांगले समजण्यात येते; तर झणऋ ब्रेईन - हेल्थ, स्किन हेल्थसाठी, तसेच इन्फ्लमेशन घटवण्यासाठी चांगले समजले जाते. म्हणून सगळ्याच गाेष्टींमध्ये एकाच ऑईलचा वापर करण्याऐवजी तीन - चार ऑईलचा, पदार्थांच्या हिशेबाने वापर केला पाहिजे.
काय लक्षात ठेवावे? तेल शरीरासाठी तेव्हाच चांगले असते जेव्हा ते प्रमाणात आणि याेग्य पद्धतीने घेण्यात येते. व्यक्तीने दिवसातून चार ते पाच टीस्पून पेक्षा जास्त तेलाचे सेवन केले नाही पाहिजे. तेलाऐवजी हेझलनट्स, बदाम, पिस्ते, दूध, दही, तूप, चीझ, पंपकीन सीड्स, चिया सीड्स वगैरेंमध्येही फॅट असतेच.