
उंदरावर केलेल्या प्रयाेगानुसार आता माणसाच्या मेंदूचे रहस्य उलगडण्यासाठी काही प्रमाणात मदत मिळू शकेल.
माणसाचा मेंदू आजसुद्धा एक रहस्य ठरला आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ मेंदूचे रहस्य उलगडण्यासाठी रात्रंदिवस संशाेधन करत आहेत. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी काॅलेज ऑफ लंडनचे संशाेधक डाॅ. नील बर्जेस यांनी मेंदूच्या या गुंतागुंतीच्या रचनेला लक्षात घेऊन आता एका राेबाेटची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. इथे साेबतच्या फाेटाेवरून असे वाटते की, ते आपल्या या राेबाेटशी बाेलतच आहेत. त्यांना हे जाणण्याची इच्छा आहे की, आपल्या मेंदूत समजण्याची आणि वस्तू लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती काम कशी करते? आपल्या या शाेधासाठी बर्जेस यांनी सर्वांत आधी उंदरांवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी हे पाहण्याचा प्रयत्न केला की, उंदरांना जेव्हा भूक लागते, तेव्हा त्यांचा मेंदू भाेजन शाेधण्यासाठी त्यांच्याकडून काय काय कामे करून घेताे. उंदरांच्या मेंदूत हाेणाऱ्या हालचालींच्या आधारावर बर्जेस यांनी एक राेबाेट तयार केला. हा राेबाेट उंदरांप्रमाणे खाेलीत हिंडताे फिरताे आणि भाेजन मिळाल्यास उंदराप्रमाणे ते कुरतडण्यास सुरुवात करताे. आपल्या या यशानंतर बर्जेस यांनी काही स्वयंसेवकांच्या मदतीने जाणले की, भाेजन शाेधण्याच्या स्थितीत मेंदूच्या आतमध्ये ‘हिपाेकॅम्पस’ नावाच्या भागाचा उपयाेग हाेताे आणि मनुष्यसुद्धा याचाच वापर करताे.