वडील या नात्याने आपल्या मुलाचे चांगले संगाेपन करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्यांना शिकवणे, आय. ए. एस., डाॅक्टर, इंजिनीअर बनवणे हेही तुमचे कर्तव्यच आहे.त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवणे हेही तुमचे कर्तव्यच आहे. मात्र, यापेक्षाही माेठे कर्तव्य काेणते असेल, तर त्यांना एक चांगला माणूस बनवणे. एक असा माणूस जाे माणुसकीची कदर करणे जाणताे. मुलांमधून उत्तम माणूस घडविणे हे पालकाचे परमकर्तव्य आहे. मुलांच्या काेवळ्या वयापासूनच हे धडे त्यांना द्यावेत.