महाराष्ट्रात 42892 काेटींची गुंतवणूक हाेणार

22 Aug 2025 13:14:23
 
मुख्यमंत्री देवेंद्र
 
मुंबई, 21 ऑगस्ट (आ.प्र.) : महाराष्ट्र डेटा सेंटर कॅपिटल आणि साैरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रात येत असून, उत्पादन क्षेत्रातही माेठी क्रांती घडणार आहे. ब्रिटनसाेबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून, देशात अधिक गुंतवणूक हाेत आहे. गुंतवणूकदार आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे द्याेतक आहे.
विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार आणि दाेन रणनीतिक करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात 42 हजार काेटींची गुंतवणूक हाेऊन 28 हजारांपेक्षा जास्त राेजगार निर्मिती हाेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मंत्रालयातील समिती कक्षात 10 सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. त्यावेळी ते गुंतवणूकदारांसमवेत बाेलत हाेते. यावेळी मुख्य सचिव राजेशकुमार, उद्याेग सचिव डाॅ. पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, तसेच विविध क्षेत्रांतील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.
ज्युपिटर इंटरनॅशनल लि., राेचक सिस्टिम्स प्रा.लि., राेव्हिसन टेक हब प्रा.लि., वाॅव आयर्न अँड स्टील प्रा.लि., वेबमिंट डिजिटल प्रा.लि., टलास काॅप्काे, एलएनके ग्रीन एनर्जी, व प्रेस्टीज इस्टेट प्राेजेक्ट लि. या कंपनीसाेबत यावेळी करार करण्यात आले.
याशिवाय ग्लाेबल इंडिया बिझिनेस काॅरिडाॅरतर्फे महाराष्ट्रात ब्रिटन व युराेपमधील गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी सहकार्य करण्याचा सामंजस्य करार आणि टीयूटीआर हायपरलूप कंपनीकडून जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात करार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0