संध्यानंद.काॅम दुबई युट्यूबर माेहम्मद बेराघदारी यांनी त्यांची 500,000 डाॅलर्सची (अंदाजे 4.3 काेटी रुपये) फेरारी कार सजावट म्हणून वापरली आहे आणि ती त्यांच्या घराच्या छतावर झुंबर म्हणून लटकवली आहे. माेहम्मद बेराघदारी हा एक इराणी व्हीलाॅगर आहे, जाे त्यांच्या व्हीलाॅगमध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील आलिशान मालमत्ता दाखवताे. त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट ‘मूव्हलाॅग्स’ म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लाईक्स आणि 24 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त, व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नेटिझन्सनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.
छतावर लटकलेली फेरारी ही त्याची आजपर्यंतची सर्वात धाडसी घर सजावट असल्याचे त्या युट्यूबरने सांगितले. तथापि, त्याने स्पष्ट केले की ती प्रत्यक्ष फेरारी नसून जेट कार हाेती. ती एका लक्झरी स्पाेर्ट्स कारसारखी दिसण्यासाठी डिझाइन करण्यात आली हाेती. ती पाण्यात जेट स्की म्हणून देखील वापरली जाऊ शकते. त्याने सांगितले की ही कार एका कस्टम पुली सिस्टमशी जाेडलेली आहे आणि छतापर्यंत उंच नेली आहे