ओशाे - गीता-दर्शन

22 Aug 2025 11:59:52
 
ओशाे.jpg
 
स्वीकार ही मु्नती आहे.अस्वीकृतीमागे पाप लपते अन् स्वीकृतीमध्ये त्याचे विसर्जन हाेऊन जाते. येशूंनी म्हटले, ‘मला तू यात गुंतवू नकाेस. मी काही तुझा न्यायाधीश व्हायचा नाही, कारण काेणी माझा न्यायाधीश असावा अशी माझी इच्छा नाही.’ इतरांनी तुमच्याशी जसे वागावं असे तुम्हाला वाटत नसेल, तर कृपा करून तुम्हीही त्यांच्याशी तसे वागू नका.
 
येशूंनी जे नवं बायबल सांगितलं, त्याचं सार काय? एका वा्नयात हेच की, ‘दुसऱ्यांनी तुमच्याशी जाे व्यवहार करू नये असे तुम्हाला वाटते, ताे व्यवहार तुम्हीही त्यांच्याशी करू नका.’ हे वा्नय जर नीट समजून घेतले तर कृष्णाच्या या सूत्राचा अर्थ लक्षात येईल.
कित्येक वेळा अशी गंमत हाेते की, कृष्णाच्या एखाद्या वा्नयाचे स्पष्टीकरण बायबलमध्ये हाेते तर बायबलमधल्या एखाद्या विधानाचे स्पष्टीकरण गीतेत हाेते. कधी कुराणातल्या कुठल्यातरी सूत्राचे, आयताचे स्पष्टीकरण वेदात हाेते. तर कुठल्यातरी वैदिक सूत्राचे स्पष्टीकरण काेणीतरी ज्यू फकीर करून जाताे. कधी बुद्धाचं कुठलंतरी वचन चीनमध्ये समजून घेतले जाते. तर कधी चीनमधल्या लाओत्सेचे एखादे वचन एखादा कबीर समजावताे.. धर्माधर्मांमध्ये आंतरिक प्रवाह बरेच असतात, पण धर्माच्या इत्नया भिंती उभारल्या गेल्या आहेत की या आंतर्प्रवाहांचे काहीच स्मरण आपणास त्या भिंतीमुळे राहत नाही. नाहीतर प्रत्येक मंदिर आणि मशिदीच्या तळघरातून बाेगदे निघायला पाहिजे हाेते, अशासाठी की त्यातून कुणालाही मंदिरातून मशिदीकडे जाता यावे. (क्रमश:)
Powered By Sangraha 9.0