स्वार्थ सांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा ।2।

21 Aug 2025 18:00:53
 
स्वार्थ सांडून प्रपंचाचा
 
तसे मुमुक्षू हाेणे म्हणजे बद्धाला आपला रस्ता चुकल्याचे ज्ञान हाेणेच हाेय. अर्थात चुकलेल्या साेलापूरच्या रस्त्याने परत माघारी पुण्याला येऊन मग आळंदीचा रस्ता धरावा लागताे, तसेच मुमुक्षूला जुने कुसंस्कार पुसून टाकून मगच सुसंस्कारांची जाेपासना करावी लागते, हेही खरेच आहे. अर्थात काही माणसांना आपला रस्ता चुकला आहे, हेच आयुष्य संपेपर्यंत कळतच नाही आणि मग ती आळंदीऐवजी भलतीकडेच भरकटतात आणि मनुष्यजन्म वाया घालवून पुन्हा जन्ममरणाच्या ेऱ्यातच अडकून पडतात, हेही खरे आहे. असे बद्ध आयुष्यभर बद्धच राहतात. मुमुक्षू व पुढची उच्च गती त्यांना कधीच प्राप्त हाेत नाही. म्हणूनच मुमुक्षू स्थिती येणे ही भाग्यखूणच समजली पाहिजे.
 
अशा मुमुक्षूची पुढील साधकपदाकडे कशी वाटचाल सुरू हाेते, याचे वर्णन या समासाच्या उपसंहारात श्रीसमर्थांनी केले आहे. ते म्हणतात, पश्चात्तापाने पाेळून पावन झालेल्या मुमुक्षूला आपण धरलेल्या खाेट्या माेठेपणाची लाज वाटू लागते.
 त्याची संतांच्यावर श्रद्धा बसते आणि परमार्थमार्ग आक्रमण्यासाठी ताे काया, वाचा आणि मन या तिन्हींच्या याेगाने प्रयत्न करू लागताे. त्याची प्रपंचातील स्वार्थबुद्धी संपून जाते.
 
ऐहिकातील नश्वरत्व त्याला पटते आणि परमरर्थाविषयी उत्कट इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झालेली असते. त्यासाठी ताे संतसज्जनांचा दास हाेण्याचा मनापासून निश्चय करताे. मुमुक्षूची अशी लक्षणे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, बद्धाच्या पुढची प्रगतीची अवस्था मुमुक्षूची आहे. त्याची ही लक्षणे श्राेत्यांनी जाणावीत आणि पुढील समासात याच्या परमार्थप्रगतीची पुढची पायरी म्हणजे साधकावस्था वर्णन केलेली आहे, तसे हाेण्याचा निर्धार करावा!
 
-प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0