एसटीची वार्षिक 11.80 काेटींची बचत हाेणार

02 Aug 2025 23:08:47
 

ST 
 
राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना इंडियन ऑइल आणि भारत पेट्राेलियम या कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा करण्यात येताे. या दाेन्ही कंपन्यांनी डिझेलवर देणात येणाऱ्या सवलतीत प्रतिलिटर 30 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी 3.23 लाख रुपये आणि वर्षाला सुमारे 11.80 काेटी रुपयांची बचत हाेणार आहे.गेल्या 70 वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी इंडियन ऑइल आणि भारत पेट्राेलियम या कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत आहे. एसटीला राेज सरासरी 10 काेटी 78 लाख लिटर डिझेल लागते.या कंपन्यांकडून एसटीला प्रतिलिटर सवलत देण्यात येते; परंतु एसटीने वारंवार विनंती करूनही या कंपन्यांनी अनेक वर्ष सवलतीच्या दरात बदल केला नव्हता.
 
राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कंपन्यांनी सवलत दरात वाढीचा निर्णय घेतला. त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्राेलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठका झाल्या. तसेच डिझेल पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यासाेबतही वाटाघाटी करण्यात आल्या. स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रियाही राबवण्याची तयारी करण्यात आली. या सर्वांचा परिणाम म्हणून संबंधित कंपन्यांनी सवलतीच्या दरात वाढीची तयारी दर्शवली. त्यानुसार1 ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे.
 
इंडियन ऑइल आणि भारत पेट्राेलियम या कंपन्या सध्या एसटीच्या 251 आगारांतील पेट्राेल पंपांवर राेज सरासरी 10 काेटी 78 लाख लिटर डिझेलचा पुरवठा करत आहेत. भविष्यात बसच्या संख्येत वाढ झाल्यानंतर डिझेलच्या मागणीत वाढ हाेणार आहे. त्यामुळे सवलतीत प्रतिलिटर 30 पैसे वाढ केल्यामुळे वर्षाकाठी एसटीची अंदाजे 12 काेटींची बचत हाेणार आहे.एसटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. अशा स्थितीत ज्या ठिकाणी पैशाची बचत आणि काटकसर करणे शक्य आहे, तेथे ती केली पाहिजे.तसेच, तिकीट विक्रीव्यतिर्नित उत्पन्नाचे इतर स्राेत निर्माण करणे गरजेचे आहे.या दाेन्ही प्रयत्नांतून भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्य्नत केला.
Powered By Sangraha 9.0