ओशाे - गीता-दर्शन

02 Aug 2025 22:50:07
 

Osho 
 
जाे माणूस शिवी परतून देऊ शकत नाही, त्याला शिवी द्यायला आपल्याला काय हरकत? म्हणून आपल्यापेक्षा दुबळ्यांना आपण सगळे शिव्या देताे. म्हणून तर आपण वेळ-अवेळ न बघता, जरूर नसले तरी शिव्या देताे. आपल्याहून काेणी कमजाेर दिसला की केव्हा एकदा त्याला सतावून घेताे असे आपल्याला हाेते. येशूंनी त्याला म्हटले, ‘या बैलांना तुझ्या शिव्या परत करता आल्या असत्या तर बरं झालं असतं. त्यात कमी धाेका हाेता.कारण लगेच देवाण-घेवाण हाेऊन प्रकरण संपलं असतं. पण हे बैल काही शिव्या देऊ शकणार नाहीत.शिव्या मात्र अवश्यच उलटून येणार आहेत. या शिव्या आधी बंद कर बघू.’ त्याने येशू ख्रिस्तांच्या डाेळ्यात पाहिले, त्यांचा आनंद, त्यांची शांती याचे अवलाेकन केले.
 
त्याने लगेचच त्यांचे पाय धरले आणि म्हटले, ‘मी शपथ घेताे की, आता मी या बैलांना शिव्या देणार नाही.’ अन् येशू दुसऱ्या गावाला निघून गेले.दाेन चार दिवस त्या शेतकऱ्याने स्वत:ला चांगलेच थाेपवून धरले. पण शपथांनी जगातल्या सगळ्या गाेष्टी कशा थांबवणार? अशा प्रतिज्ञा करून सगळ्या गाेष्टी झाल्या असत्या तर मग काय? गाेष्टी उमजल्या तर मग फरक पडताे. येशू ख्रिस्तांच्या प्रभावाने शपथ घेतली हाेती. बळेच घेतली हाेती. दाेन-चार दिवस त्याने स्वत:ला थाेपवले, कसेबसे. त्या अवधीत शपथेचा प्रभाव क्षीण झाला. ताे परत आपल्या पूर्वपदावर आला.अन् त्याने विचार केला, ‘छे,यात काही अर्थ नाही.अशाने पंचाईत हाेईल आपली.
Powered By Sangraha 9.0