विकास खारगे यांनी स्वीकारला पदभार

02 Aug 2025 23:02:42
 
 

kharage 
 
मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाेता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांत महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. महसूल विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळे आणि खारगे यांनी विभागाच्या कामाचा तसेच पुढील कामांच्या नियाेजनाचा आढावा घेतला. जाणीवपूर्वक झालेला काेणताही गैरप्रकार स्वीकारला जाणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. विभागातील प्रलंबित प्रकरणे कालबद्ध पद्धतीने निकाली काढून काेणतेही काम प्रलंबित राहू नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. विभागाचे कामकाज यापुढे संपूर्णपणे ई-ऑफिसच्या माध्यमातून चालणार असल्याचे खारगे यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभागाचे कामकाज गतिमान, पारदर्शक आणि लाेकाभिमुख पद्धतीने सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0