प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकेचे लाेकार्पण

02 Aug 2025 23:01:41
 

ambulance 
 
समस्त महाजन या संस्थेच्या अर्हम अनुकंपा प्राेजेक्टअंतर्गत मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील गाेमाता आणि इतर प्राण्यांच्या सेवेसाठी असलेल्या सुपर स्पेशालिटी प्राणी रुग्णवाहिकेचे लाेकार्पण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त गिरीश शहा, विश्वस्त परेश शहा; तसेच जैन समाजातील बांधव उपस्थित हाेते. समस्त महाजन या संस्थेच्या अर्हम अनुकंपा प्राेजेक्टअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णवाहिका मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांतील गाेमाता व इतर जखमी प्राण्यांवर उपचार करणार आहे. विविध गाेशाळांमधील जखमी, आजारी गायी व इतर प्राण्यांना दवाखान्यात नेण्यासाठी हायड्राेलिक रुग्णवाहिका महत्त्वाची ठरणार आहे. प्राणीमात्रांचे दुःख दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0