पुढील काही दिवसांत उत्सवांची धामधूम सुरू हाेत आहे. गणेशाेत्सव व नवरात्राेत्सव या कालावधीत विविध मंडळे, धार्मिक संघटना व पक्षांकडून माेठ्या प्रमाणात र्नतदान शिबिरांचे आयाेजन केले जाते. मात्र, या कालावधीत संकलित करण्यात येणाऱ्या र्नतापैकी काही रक्तवाया जाते. याचा फटका भविष्यातील र्नतसंकलनावर हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्सवकाळात अतिर्नित रक्तसंकलन हाेणार नाही, याची काळजी घेऊन आयाेजकांनी र्नताच्या तुटवड्याच्या कालावधीत र्नतदान शिबिरांचे आयाेजन करण्यास विनंती करावी, अशा सूचना राज्य रक्तसंक्रमण परिषदेने (एसबीटीसी) राज्यातील सर्व र्नतपेढ्यांना दिल्या आहेत.दरवर्षी दिवाळीत अनेक दाते पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. दरवर्षी या कालावधीत र्नताचा तुटवडाजाणवताे. संकलित केलेले रक्तआणि त्यावर प्रक्रिया करून विलग केलेल्या लाल पेशींची जीवन मर्यादा 35 दिवसांची असते.
त्यानंतर हे रक्तव लाल पेशी वापरण्यासाठी अयाेग्य ठरतात. त्यामुळे त्यांचा वापर वेळेत हाेणे आवश्यक असते. परिणामी, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये संकलित केलेले रक्तदिवाळीपर्यंत वापरण्यायाेग्य राहत नाही; तसेच व्य्नतीला तीन महिन्यांनी र्नतदान करता येते.त्यातच र्नतदान करणाऱ्या व्य्नती ठराविकच असल्याने त्यांनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये र्नतदान केल्यास ऑक्टाेबर, नाेव्हेंबरमध्ये त्यांना र्नतदान करता येत नाही. परिणामी या कालावधीत र्नततुटवडा हाेताे. त्यामुळे उत्सवकाळात र्नतदान शिबिरांचे आयाेजकरण्याबाबत राज्य रक्तसंक्रमण परिषदेने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टाेबर या महिन्यांतील मागील तीन वर्षांची र्नताची सरासरी मागणी लक्षात घेऊन त्यानुसारच रक्तसंकलन करावे; तसेच या कालावधीत काेणत्याही स्थितीत अतिर्नित रक्तसंकलन हाेणार नाही व रक्तमुदतबाह्य हाेऊन ते वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सहायक संचालक डाॅ. पुरुषाेत्तम पुरी यांनी दिल्या आहेत.