पायरसीला आळा घालण्यासाठी टास्क फाेर्सची स्थापना

    18-Aug-2025
Total Views |
 


task
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी) पायरसी राेखण्यासाठी टास्क फाेर्स स्थापन केला आहे. ‘या पायरसीमुळे (सामग्रीची चाेरी) माध्यमे आणि मनाेरंजन व्यवसायाला दरवर्षी 20,750 काेटी रुपये नुकसान हाेते,’ असे एका प्रमुख उद्याेजकाने सांगितले.‘एमआयबीचे सचिव संजय जाजू यांनी भारतीय उद्याेग संघाच्या (सीआयआय) सदस्यांना या टास्क फाेर्सबाबत माहिती दिली,’ असे सीआयआयचे अध्यक्ष गाैरव बॅनर्जी यांनी सांगितले.‘पायरसीला तातडीने आणि प्रभावीपणे थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.सरकारकडून टास्क फाेर्स स्थापन केल्याचे ऐकून आनंद झाला,’ असे बॅनर्जी म्हणाले.‘काेणताही चित्रपट जर लीक झाला तर, ताे त्याच दिवशी सर्व माध्यमांमधून काढून घेणे गरजेचे आहे.इंटरनेट अँड माेबाइल असाेसिएशन ऑफ इंडिया यांनी 2024मध्ये प्रसिद्ध केलेल्या रिपाेर्टनुसार, भारतातील पायरसीचा आकडा 2023मध्ये 22,400 काेटी रुपये हाेता, जाे देशातील मीडिया आणि मनाेरंजन क्षेत्रातील उत्पन्नात चाैथ्या क्रमांकावर हाेता.
 
एमआयबीने सीआयआय सारख्या उद्याेग संघटनांबराेबर पायरसीविराेधी उपाययाेजनांवर काम केले आहे. सीआयआयने मंत्रालयाबराेबर मिळून पायरसीविराेधी कारवाई सुरू केली आहे. ‘विविध मंत्रालयांची एक समिती पायरसीविराेधी प्रयत्नांना बळकट करण्यासाठी स्थापन केली गेली आहे,’ माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी राज्यसभेत सांगितले.अध्यक्ष बॅनर्जी यांनी दाेन महत्त्वाच्याप्राधान्यक्रमांबद्दल सांगितले, ‘सरकारबराेबर काम करून धाेरणात्मक चाैकट तयार करणे, ज्यामुळे देशाच्या सामाजिक रचनेचे रक्षण हाेईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) प्रभावासाठी तयारी करणे, प्रतिभा, उपजीविका व ग्राहकांच्या हितासाठी आवश्यक आहे.’ बॅनर्जी यांनी दूरदर्शन आणि ओटीटी प्लॅटफाॅर्मसाठी संतुलित नियमांची मागणी केली, ज्यामुळे सर्जनशीलतेला पाठबळ मिळेल, देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर आर्थिक व सांस्कृतिक मूल्य मिळेल.सध्या, मनाेरंजन उद्याेग जीडीपीमध्ये 1% पेक्षा कमी याेगदान देते, परंतु सार्वजनिक- खासगी भागीदारीद्वारे यामध्ये वाढ हाेऊ शकते,’ बॅनर्जी म्हणाले.