आपली त्वचा पाण्याच्या प्रभावाने चमकू लागेल

18 Aug 2025 15:32:20
 
 

skin 
 
न्यूट्रिशनिस्ट सांगते की, सामान्यत: एक दिवसात आठ ग्लास पाणी शरीरासाठी पुरेसे असते. याशिवाय शरीराला फळे आणि भाज्यांद्वारेही भरपूर पाणी मिळते. सामान्यत: आठ ग्लास पाण्याव्यतिरिक्त आपल्या जेवणाचा पन्नास टक्के भाग अशा भाज्या आणि फळांनी भरलेला असावा की, ज्यामुळे शरीराला ओल मिळेल.उरलेल्या भागात प्राेटीन आणि कार्बाेहायड्रेटना जागा द्यायला हवी. पण प्रत्येक शरीर एकसारखे नसते.जर एखाद्याला किडनीची समस्या असेल तर त्याने वैद्यकीय सल्ल्यानंतरच पाण्याची पातळी ठरवायला हवी. सामान्य शरीरात जर घाम जास्त येत असेल तर आपण एक ग्लास पाणी वाढवू शकता. यापेक्षा जास्त पाणी एका दिवसात प्याल्यामुळे शरीरात इले्नट्राेलाइट असंतुलन हाेऊ लागते. कारण लघवीवाटे शरीरातून आवश्यक मिनरल्स निघून जातात. अशावेळी आपल्याला अशक्तपणा, सांधेदुखी, डाेकदुखी अशा समस्या जाणवू शकतात.
 
अशी येते चमक पाणी आपल्या शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर काढते त्यामुळे हे एकटेच उत्तम डिटाॅ्नस आहेशरीरात विषाक्त घटक असल्यास त्वचा काेमेजलेली, डागाळलेली दिसू लागते. पाण्याचे प्रमाण वाढवल्यास शरीरातून टाॅ्निसन बाहेर पडू लागतात व त्वचेवर याचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळताे. पण हा एक दिवसाचा खेळ नसून यासाठी आपल्या पाण्याच्या पुरेशा प्रमाणाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवायला हवा. त्वचेत असणारे काेलेजन पाण्याअभावी कमजाेर पडू लागतात. अशावेळी पुरेसे पाणी प्याले तर काेलेजनचे प्रमाण व्यवस्थित राहते व उतारवयाच्या खुणा उशीरा दिसू लागतात.कसे पाणी प्यावे : थंड पाणी प्यावे की नाही हाही एक माेठा प्रश्न आहे. सामान्यत: पाण्याचे तापमान आपल्या शरीराच्या स्थितीवर अवलंबून असते. आपल्या फुफ्फुसे वा श्वासाची समस्या नसेल तर फ्रिजचे पाणी प्याल्यामुळे आपल्यावर काेणताही दुष्प्रभाव पडत नाही.
 
तसे जेवणानंतर अशा प्रकारचे पाणी पिऊ नये. मट्नयाचे तापमान शरीरासाठी सर्वांत आदर्श मानले जाते शिवाय यात पाण्याची गुणवत्ताही बदलत नसते.काही अध्ययन अल्कलाइन वाॅटर सामान्य पाण्यापेक्षा उत्तम सांगतात. कारण यामुळे शरीराचा पीएच संतुलित राहताे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अल्कलाइन वाॅटर बनते, पण असे पाणी विशेष वैद्यकीय स्थितींमध्ये पिऊ नये.
पाणी का हवे जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता पडत असेल तर आपली त्वचा रुक्ष दिसू लागते. एवढेच नव्हे तर त्वचेसंबंधित समस्याही लवकर हाेऊ शकतात. त्वचेवर भेगा पडणे, लाल चट्टे अशा समस्याही पाण्याची कमतरता दर्शवतात. तळहात, दंड व मानेच्या त्वचेवरही याचा परिणाम दिसून येताे.तेच पुरेशा प्रमाणात पाणी प्याल्यामुळे त्वचेत चमक व लवचिकता राहील.
Powered By Sangraha 9.0