विद्युत सहायकांची निवड यादी जाहीर

18 Aug 2025 14:48:37
 
maha
 
मुंबई, 17 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या 5381 उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांत 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान करण्यात येईल. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांत मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे; तसेच अद्ययावत ओळखपत्राच्या मूळ प्रतींसह स्वतः हजर राहावे.
 
महावितरणने विद्युत सहायक पदासाठी 20 ते 22 मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. यात निवड झालेल्या उमेदवारांची यादी 30 जुलैस माहिती व सूचनेसह कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला निवड यादीतील उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान उमेदवारांची संबंधित परिमंडलांत सकाळी 10 वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल.
Powered By Sangraha 9.0