पीसीएमसीच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांचा सन्मान

18 Aug 2025 14:58:57
 
 pc
पिंपरी, 17 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
देशसेवा, मानवसेवा आणि संकटसमयी जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या वीरांचा गौरव करण्यासाठी के ई फायर अँड सेफ्टी या 1998 पासून कार्यरत अग्रगण्य संस्थेद्वारे प्रतिष्ठित ‌‘सेफ इंडिया हिरो प्लस पुरस्कार‌’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मुंबईतील ऐतिहासिक हॉटेल ताज येथे 13 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. हा पुरस्कार देशातील उत्कृष्ट अग्निशामक, बचावकर्ते आणि संकटसमयी धाडसी कार्य करणाऱ्या अग्निशमन कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दिला जातो.
 
या वर्षीच्या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील फायरमन दिनेश देविदास इंगळकर, मोशी अग्निशामक केंद्राचे वाहनचालक शांताराम पांडुरंग घारे, मुख्य अग्निशमन केंद्राचे लिडिंग फायरमन, हनुमंत धोंडीबा होले, फायरमन संतोष मधुकर सरोटे, फायरमन विलास राजाराम पाटील यांचा सन्मान करण्यात आला. 
 
आपल्या अग्निशामक दलातील हे वीर केवळ संकटांचा सामना करत नाहीत, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची हमी देतात. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि राष्ट्रप्रेम हे पिंपरी-चिंचवड शहराच्या अभिमानाचे शिखर आहे. ‌‘सेफ इंडिया हिरो प्लस‌’ हा सन्मान मिळणे ही केवळ त्यांचीच नव्हे, तर संपूर्ण शहराची प्रतिष्ठा आणि गौरव वृद्धिंगत करणारी घटना आहे.
-शेखर सिंह, (आयुक्त तथा प्रशासक)
Powered By Sangraha 9.0