ओशाे - गीता-दर्शन

18 Aug 2025 16:09:27
 

Osho 
आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहाेत त्यावरून ठरवायचे म्हटले तर, जीवन म्हणजे एक मेकॅनिकल रिपिटेशन, यांत्रिक पुनरावृत्तीपेक्षा जास्त काहीही नाही, असेच म्हणावे लागते.त्याच घसरगुंड्या अन् त्याच चुका. नव्या चुका करणारे संशाेधक लाेकही फारच कमी आहेत. आपण फ्नत जुन्याच चुकांची पुनरावृत्ती करीत राहताे. एखादी नवी चूक करावी एवढी पण प्रतिभा आपल्यात नाही. काल केले हाेते तेच परवाही केले हाेते, तेच आज पुन: करायचे, तेच उद्या पुन: करायचे. या गाेष्टीबद्दल जागरूक व्हाल, आपल्या वृत्तींच्या शत्रुत्वाबद्दल जागरूक व्हाल, तर आपल्या स्वत:शी मैत्रीचा पाया घालणे सहजगत्या सुरू हाेईल.
 
कृष्ण वा बुद्ध वा महावीर वा ख्रिस्त यांच्यासारखे लाेक स्वत:साठीच इत्नया माेठ्या आनंदाचा रस्ता बनवून ठेवतात की, त्या आनंदाची गणतीसुद्धा करता येणार नाही. वरवर पाहिले तर असे वाटते की हे लाेक त्यागी आहेत, पण मी सांगताे की यांच्यासारखी परमस्वार्थी माणसे आणखी काेणतीही नाहीत. आपणाला त्यागी म्हणता येईल. कारण आपल्यापेक्षा जास्त मूढ, मूर्ख आणखी काेणीच नाही. जे काही महत्त्वपूर्ण आहे ते सारे आपण टाकून देताे. आणि जाे कचरा आहे ताे आपण साठवताे आणि हे जे प्रेषित जन आहेत ते जे जे व्यर्थ आहे ते ते फेकून देतात आणि जे जे सार्थक आहे तेवढेच वाचवतात. हे खूप हुशार लाेक आहेत.इकडे स्वीकृती नि तिकडे सुटका येशू एका गावाबाहेर थांबलेले असतात.संध्याकाळची वेळ.
Powered By Sangraha 9.0