झाेपडपट्टीमु्नत मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा

18 Aug 2025 15:19:33
 
 
Mumbai
 
‘मुंबई झाेपडपट्टीमु्नत करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकाेत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वा वर्षात प्लाॅट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावी, तरच झाेपडपट्टीमु्नत मुंबईचे स्वप्न साकार हाेईल. नव्या कल्पना, नवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकाेनातून हे परिवर्तन साध्य हाेऊ शकते,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते. ‘क्रेडाई’चे माजी अध्यक्ष डाॅमिनिक राेमल, सचिव ऋषी मेहता, माजी सचिव धवल अजमेरा, मुख्य कार्यकारी अधिकारी केवल वलांभिया, तसेच रिअल इस्टेट व्यवसायातील मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.
 
अटल सेतूमुळे तिसरी मुंबई उभारण्याची संधी खुली झाली आहे. तिसऱ्या मुंबईत एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. ही नवी मुंबई विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असेल. केंद्र सरकारने परदेशी विद्यापीठांना देशात येण्याची परवानगी दिल्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण येथे देता येणार आहे. येथे 300 एकर जमिनीवर जगातील सर्वाेच्च 12 विद्यापीठांना आणण्याची याेजना असून, त्यांना जमीन आणि काही पायाभूत सुविधा राज्य शासनाकडून दिल्या जातील. एकूण एक लाख निवासी विद्यार्थी येथे राहतील. त्यामुळे येथे प्रचंड आर्थिक आणि सामाजिक चैतन्य निर्माण हाेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0