हजाराे तरुणाईचा जल्लाेष.पुण्यातील 26 सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून हा संयु्नत दहीहंडी उत्सव सुरू केला आहे. या वर्षीची संयु्नत दहीहंडी डीजेमु्नत साजरी करण्याची घाेषणा पुनीत बालन यांनी केली हाेती. त्यामुळे या डीजेमु्नत दहीहंडीबद्दल पुणेकरांच्या प्रतिसादाबाबत उत्सुकता हाेती. मात्र, ढाेल-ताशांचा गजर आणि वरळी बिट्सच्या संगीतावर हजाराे पुणेकरांनी ठेका धरला आणि डीजेमु्नत दहीहंडीचा प्रयाेग यशस्वी करत एक नवीन पायंडा पाडला.प्रभात बँडच्या सुमधुर वादनाने या दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात झाली. युवा वाद्यपथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा या ढाेल पथकांच्या जाेरदार वादनाने या कार्यक्रमाची रंगत वाढली आणि वरळी बिट्स बँडने केलेल्या वादनाने अवघे वातावरण गाेविंदामय हाेऊन गेले.
दहीहंडीच्या सलामीकरिता वंदे मातरम दहीहंडी संघ, नटराज संघ, म्हसाेबा संघ, भाेईराज संघ, गणेश मित्र मंडळ संघ, गणेश महिला गाेविंदा पथक, गणेश ताेफखाना दहीहंडी संघ, नवज्याेत ग्रुप संघ, इंद्रेश्वर संघ (इंदापूर), शिवकन्या गाेविंदा पथक (चेंबूर-मुंबई), शिवतेज ग्रुप, दहीहंडी संघ यांसारख्या अनेक गाेविंदा पथकांनी माेठ्या उत्साहात सहभाग घेतला.
रात्री पावणेदहा वाजता राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही ऐतिहासिक दहीहंडी फाेडण्याचा मान मिळविला. या वर्षीच्या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपरिक ‘शिव महाकाल’ पथक हाेते.या पथकाच्या तालावर नाचत तरुणाईने जल्लाेष केला.कार्यक्रमाला अभिनेता-दिगदर्शक प्रवीण तरडे, अभिनेता हार्दिक जाेशी, मराठी बिग बाॅसफेम इरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी या उत्सवाला हजेरी लावली.गाेविंदा रे गाेपाळा...चा जयघाेष, ढाेलताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि मुंबईतील प्रसिद्ध वरळी बिट्स यांच्या पारंपरिक संगीतावर थिरकणाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर... अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुपतर्फे आयाेजित 26 सार्वजनिक मंडळांच्या संयु्नत दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चाैकात शनिवारी (16 ऑगस्ट) रात्री तुडुंब गर्दीसमाेर राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही संयु्नत दहीहंडी फाेडण्याचा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिली डीजेमु्नत दहीहंडी साजरा करीत एक नवा आदर्श या निमित्ताने पुनीत बालन ग्रुपने लाेकांसमाेर ठेवला.