मुंबई-दिघी राे-राे सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा : राणे

15 Aug 2025 21:59:37
 

rane 
 
मुंबईकरांचा काेकणात जाण्याचा प्रवास सुखकर करणारी मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद ही राे-राे सेवा मार्च अखेरपर्यंत कार्यान्वित करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीत राणे यांनी या सूचना दिल्या. बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते. दिघी आणि काशीद या दाेन्ही ठिकाणच्या जेटीच्या कामांना गती देण्याच्या सूचना देऊन राणे म्हणाले, की मुंबईतून काेकणात जाण्यासाठी राे-राे सेवा उत्तम पर्याय आहे. या सेवेमुळे वेळेची ही बचत हाेणार आहे. त्यामुळे या याेजनेच्या कामांना गती द्यावी. जेटीचे काम सुरू असतानाच इतर परवानग्यांचे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी. आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत मच्छिमार नाैकांना द्यावयाच्या डिझेल परताव्याविषयी बैठक झाली. एकही पात्र मच्छिमार नाैका डिझेल परताव्यापासून वंचित राहणार नाही, असे राणे यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0