स्वामी रामतीर्थ भारतीय संस्कृतीच्या प्रचारासाठी अमेरिकेत गेले हाेते.अमेरिकन नागरिकांवर त्यांच्या भाषणाचा खूपच प्रभाव पडला हाेता व अनेकजणांनी त्यांचे शिष्यत्वही पत्करले हाेते. स्वामी रामतीर्थांना अनेक भेटवस्तूही मिळाल्या हाेत्या.आपल्या स्वभावानुसार ते त्या साऱ्या वस्तू समाजसेवी संस्थांना वा गरजु व्यक्तिंना देत असत. एका अमेरिकन माणसाने स्वामी रामतीर्थांना माेठ्या श्रध्देने एक अमेरिकन पाेशाख भेट दिला व ताे एकदा परिधान करावा असा आग्रह केला. स्वामी रामतीर्थ त्याचा आग्रह डावलू शकले नाहीत. अमेरिकन पाेशाखात पॅण्ट,काेट व हॅट हाेती. स्वामी रामतीर्थ यांनी काेट व पॅण्ट परिधान केली पण त्यांनी हॅट आपल्या डाे्नयावर घेतली नाही. आपला स्वदेशी साफाच डाे्नयावर घेतला.अमेरिकन माणसाने त्यांना पुन्हा आग्रह केला की आता हॅटही डाे्नयावर चढवावी. परंतु स्वामी रामतीर्थ आपल्या नकारावर ठाम राहिले.
ते स्पष्ट शब्दात व अभिमानाने म्हणाले, रामच्या डाे्नयावर नेहमी महान भारतच राहील. स्वामी रामतीर्थांच्या या राष्ट्रभक्तीसमाेर अमेरिकन नतमस्तक झाले.आम्ही भारतीय, स्त्रियांवर हात उचलत नसताे लंडनच्या एका न्यायालयाच्या पिंजऱ्यात प्रसिद्ध क्रांतिकारक उधमसिंह उभे हाेते. त्यांनी जनरल डायरला मारून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला हाेता. न्यायालयात जज तरुण क्रांतिकारक उधमसिंहना प्रश्न विचारीतच हाेते. ताेच एक इंग्रज महिला न्यायालयात आली व तिने उधमसिंहना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली.न्यायाधीशांनी परवानगी दिल्यावर तिने उधमसिंहाना विचारले, तुमच्या रिव्हाल्वरमध्ये गाेळ्या शिल्लक हाेत्या व जनरल डायरसाेबत मीही हाेते. तुम्ही मला गाेळी का मारली नाही. खरे तर तुम्ही मला गाेळी मारून सहजपणे वाचू शकला असता. शूरवीर क्रांतिकारक उधमसिंहांनी त्या महिलेला ओळखले. याच महिलेमुळे त्यांना अटक झाली हाेती.
पण त्या महिलेला पाहिल्यानंतरही उधमसिंहांनी अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, सिस्टर आम्ही भारतीय आहाेत. काेणत्याही स्त्रीवर हात उचलणे आमच्या संस्कृतीच्या व मानमर्यादेच्या विरुद्ध आहे. या श्रद्धेमुळेच मी आपल्यावर गाेळी झाडली नाही. क्रांतिकारक उधमसिंहांचे उत्तर ऐकून न्यायालयात जमलेली गर्दी एकदम शांत झाली. जजसुध्दा उधमसिंहाचा तेजस्वी चेहरा पाहातच राहिले.भारतीय जनता सद्य:स्थितीत खरच स्वातंत्र्य भाेगत आहे का?15 ऑगस्ट 2025 हा आपल्या राष्ट्राचा 79 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारताने विविध क्षेत्रांत माेलाची कामगिरी केली आहे. केवळ आपल्या देशात नव्हे तर परदेशात सुद्धा भारतीयांनी आपली छाप साेडली असे असले तरी परदेशातील भारतीय सुरक्षित आहेत का, हा भेडसावणारा प्रश्न आहे. यामागे प्रामुख्याने वांशिक भेदभाव, परकीय द्वेष (झेनाेफाेबिया) किंवा स्थानिक तणाव कारणीभूत असतात.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युराेपातील काही देशांमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तींना शिवीगाळ, शारीरिक हल्ले आणि अगदी द्वेषापाेटी केलेले गुन्हे सहन करावे लागले आहेत. काही वेळा स्थानिक राजकीय वक्तव्ये किंवा दिशाभूल करणारी माहितीही अशा घटनांना खतपाणी घालते. अशा हल्ल्यांमुळे केवळ पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांवर परिणाम हाेत नाही, तर भारत आणि संबंधित देशांमधील राजनैतिक संबंधांवरही ताण येताे.भारत सरकार वारंवार सूचना जारी करून, न्याय मिळवण्याची मागणी करून आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असते. मात्र तज्ज्ञांच्या मते, केवळ तातडीच्या उपाययाेजना पुरेशा नसून, दीर्घकालीन उपाय म्हणून परदेशातील भारतीयांचे स्थानिक समाजात समाकलन, परस्पर-सांस्कृतिक जागरूकता, तसेच द्वेषपूर्ण गुन्ह्यांवर कठाेर कायदेशीर कारवाई या गाेष्टी आवश्यक आहेत, तरच भारतीय प्रत्येक देशात सुरक्षित राहील यात तिळमात्र शंका नाही.- आल्हाद माळगावकर, पनवेल