ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक

15 Aug 2025 21:50:58
 
 

CP 
 
आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडताे. पण आजची तरुण मंडळी ग्रंथालयाकडे वळली आहेत. विविध वाचन उपक्रमांत सक्रिय भाग घेत आहेत. त्यासाठी ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध करावे, असे आवाहन करून ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढ करण्यास शासन सकारात्मक आहे, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात 2023-24 चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार पाटील व विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
 
यावेळी अपर मुख्य सचिव बी. वेणूगाेपाल रेड्डी, राज्य ग्रंथालय संचालक अशाेक गाडेकर, उपसचिव अमाेल मुत्याल, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ. गजानन काेटेवार आदी उपस्थित हाेते.राज्यातील नागरिकांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिंगत हाेण्यासाठी वाचन चळवळ अधिक समृद्ध केली पाहिजे. ज्या ग्रंथालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यांच्या नवीन बांधकामांसाठी अनुदानात शासनाने वाढ करावी.तसेच, ग्रंथालयांत तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश असावा.पालकमंत्र्यांच्या निधीतील एक टक्का निधी ग्रंथालय चळवळीसाठी द्यावा, असे डाॅ. गाेऱ्हे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0