ज्ञान वाढते : जाे जास्त बाेलताे ताे आपल्या माहितीपेक्षा जास्त सांगून जाताे, याउलट जाे ऐकण्यात रस घेताे ताे सर्वांचे विचार लक्षपूर्वक ऐकताे. यामुळे त्याला सर्वांकडून काही ना काही शिकण्याची संधी मिळते. ऐकणाऱ्याला दाेन गाेष्टींचा फायदा हाेताे. एकतर त्याला नवी माहिती कळते तर दुसरे ताे मिळालेल्या माहितीचा चांगल्याप्रकारे वापर करू शकताे.
पश्चात्ताप हाेत नाही : जे जादा बाेलतात त्यांना ते काय सांगत आहेत याचा पत्ताच नसताे व बऱ्याचदा बाेलता बाेलता ते आपल्या खासगी जीवनाविषयी सांगून जातात. यासाठी सांगितले जाते की कमी बाेला पण विचारपूर्वक बाेला.
गांभीर्याने घेतले जात नाही : बहुतेकवेळा गप्प राहिल्यामुळे लाेक आपल्याला गर्विष्ठ समजतील पण जे आपल्याजवळ असतील वा खराेखरच आपल्याला जाणत असतील तर त्यांचा हा गैरसमज लवकरच दूर हाेईलयासाेबतच जे गरजेच्या वेळी बाेलतात ते प्रत्येक गाेष्ट गांभीर्याने समजतात. आपण तेव्हाच बाेलायला हवे जेव्हा आपल्याला एखाद्या गाेष्टीची ठाम माहिती असेल. कमी बाेलल्यामुळे आपल्या बाेलण्यात गांभीर्य असते ज्यामुळे सारे आपले बाेलणे ऐकण्यात रस घेतात.
नाती मजबूत हाेतात : जेव्हा आपण एखाद्याला लक्षपूर्वक ऐकत असताे तेव्हा बाेलणाऱ्याला चांगले वाटत असते. ऐकल्याने दुसऱ्यांचे विचार चांगल्याप्रकारे समजून घेता येतात. त्यासाेबतच त्यांच्या भावना जाणवू शकतात. ज्यानुसार आपण एक याेग्य प्रतिक्रिया देण्यालायक हाेता.जर आपण विचारपूर्वक बाेलत असाल तर लाेक आपले बाेलणे ऐकण्यात रस घेतात. कारण त्यांना माहीत असते की, आपण गरज असेल तरच बाेलता. त्यामुळे आपण काही सांगत असाल तर नक्कीच काही महत्त्वाचे असेल.
कमी शब्दांत खूप काही सांगणे : कमी बाेलणाऱ्यांचे हे वैशिष्ट्य असते की ते कमी शब्दांत खूप काही सांगून जातात.ज्यामुळे त्यांची प्रत्येक गाेष्ट प्रत्येकाच्या लक्षात राहते व काेणालाही त्यांचे बाेलणे ऐकण्यात दिक्कतही नसते. यासाठी कमी शब्दांत स्पष्ट बाेला.