ओशाे - गीता-दर्शन

13 Aug 2025 14:22:11
 
 
 

Osho 
अगदी छाेट्या छाेट्या घटनांनी जीवन निर्माण हाेते.त्या भावना वर येतात. मंगलाची कामना वा ईश्वरस्मरण आपल्या आत जे श्रेष्ठ आहे त्याला वर आणते. आणि दुसऱ्याच्या आत जे श्रेष्ठ आहे तेही वर आणते.जेव्हा दाेन्ही हात जाेडून आपण आपले मस्तक एखाद्याच्या समाेर झुकवता तेव्हा आपण त्या दुसऱ्यालाही तशाच प्रकारे मस्तक झुकवण्याची संधी देता आणि अशा प्रकारे वाकण्यासारखी दुसरी उत्तम संधी नाही. असे झुकवलेले मस्तक वाईटाचं चिंतन करूच शकत नाही. झुकलेले मस्तक शिवी देऊ शकत नाही. शिवी देण्यासाठी ताठ मस्तकाची गरज असते.आजवर कधी आपण याचा विचार केला असेल वा नसेल; पण आता विचार करा.
 
जेव्हा आपण काेणाला हृदयपूर्वक नमस्कार करून नतमस्तक हाेता, अशा वेळी आपण अशी कल्पनाही करू शकलात तर फारच उत्तम की समाेरची व्य्नती ही परमात्मा आहे, तर खुद्द आपणामध्येही आपणाला बदल आढळेल आणि त्या समाेरच्या व्य्नतीमध्येही बदल आढळेल. ती व्य्नती जवळून गेली आणि आपण तिच्याबाबत परीसासारखे काम करून गेलात. त्याच्या आत काहीतरी आपण साेने बनवले आणि जेव्हा आपण इतरांसाठी परीस हाेऊन जाता तेव्हा इतरही आपणासाठी परीस हाेऊन जातात.जीवन हे असे संबंधविशेषांचे जाळे आहे. आपण संबंधात जगताे. आपण जर सर्वांसाठी परीसाचे काम केले तर बाकीचे लाेक
 
Powered By Sangraha 9.0