अनेक कामांमधून स्वतःसाठी वेळ काढायला शिका...

13 Aug 2025 14:33:25
 
 

Health 
अवघड असेल; पण वेळ काढा: अनेक कामांमधून वेळ काढणे अवघड निश्चितच असते; पण जेव्हा तुम्हाला जाणवेल की, तुम्ही उगाच मित्रांची उपेक्षा करत आहात, तेव्हा त्यांना कमीत कमी एक ाेन करा. खूप व्यस्ततेमुळे तुम्हाला भेटता येत नाही, हे जरी तुम्ही सांगितले तरी त्यांना आणि तुम्हालाही खूप बरे वाटेल. घरी भेटायला जाऊ शकत नसाल तर बाहेर भेटा. आजच्या काळात वेळ काढणे खूप अवघड आहे; पण जेव्हा वेळ मिळताे, तेव्हा वेळेचा उपयाेग याेगासनं, व्यायाम करण्यासाठी करा. जेणेकरून संपूर्ण शरीराला आराम मिळेल. काही लाेक असेही आहेत, जे आवश्यक कामं साेडून आपल्या नातेवाइकांना, मित्रांना भेटायला जातात. जर वेळेचे नियाेजन केले, तर तुम्ही निश्चितपणे वेळ काढू शकता. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या संशाेधनात आढळले की,ऑिफसमधील अतिशय व्यस्त शेड्युलमुळे ज्या व्यक्तींना वेळ काढणे अवघड जाते आणि ज्यामुळे ते एक दशकाहून अधिक काळ आपल्या मित्रांना भेटलेले नाहीत, ते तणाव, नैराश्य यांसारख्या समस्यांना सामाेरे जात आहेत. संशाेधनानुसार, आपण एका एकाकी समाजाकडे वाटचाल करत आहाेत.
 
तंत्रज्ञानाने अंतर वाढविले: भलेही नव्या तंत्रज्ञानामुळे माेबाइल, इंटरनेट, चॅनल्समुळे जग सीमित झाले आहे; पण सत्य हे आहे की, जग कितीही छाेटे झाले असले तरी लाेकांमधील संवेदना, संपर्काच्या स्तरावरील अंतर वाढलेले आहे.इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगभरात मित्र बनवत आहाेत, आपण आपल्या शेजाऱ्याला ओळखत नाही, हे वास्तव आहे. मानसाेपचार तज्ज्ञ याचं कारण जीवनात पैशाला आलेलं अनन्यसधारण महत्त्व सांगतात. पूर्वी आपल्याकडे जे हाेतं, त्यामध्ये आपण समाधानी हाेताे.आज आपल्याला सगळ्या साेयीसुविधा हव्या असतात.त्यासाठी आपल्याला खूप जास्त पैसाही हवा असताे.नाेकरीकरिताही बाजारात तगडी स्पर्धा आहे. पगारही मनासारखा मिळत नाही. अधिक पगारासाठी स्वतः ला खूप जास्त व्यस्तकरणे धाेकादायक ठरू शकते.परिणामी स्वतःसाठी वेळ न मिळाल्याने त्यांना त्रास हाेताे, चिडचिड हाेते, भावनांमध्ये बाधा येते. अनेकदा काम करण्यातही अडथळा जाणवताे. परिणामी त्यांना खूप नैराश्य येते. तीव्र उदासी येते. यामुळे व्य्नती हिंसक हाेण्याची शक्यता वाढते.
Powered By Sangraha 9.0