आपण आयुष्याबद्दल काय शिकलाे?

12 Aug 2025 22:28:57
 

thoughts 
1) पैसा हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबराेबर तुम्हांला कायम दुसऱ्याकडे त्यांच्या पैशाचे व्यवस्थापन करण्याची नाेकरी करायची नसेल तर वैयक्तिक अर्थकारणाचे (जमा-खर्च, बचत आणि गुंतवणूक) व्यवस्थापन कसे करायचे हे देखील माहीत असणे महत्त्वाचे आहे.
 
2) सतत विशिष्ट गाेष्टीविषयी किंवा स्थितीविषयी तक्रारी करत बसण्यापेक्षा उपाय शाेधायला शिका.
 
3) वेग कायम ठेवण्यासाठी सतत पॅडल मारत राहणे म्हणजे जीवन नव्हे तर तुम्हांला जे शिकवले आहे त्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन स्वतः ची क्षमता सिद्ध करणे. म्हणजेच सावकाश आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश प्राप्त हाेते.
 
4) तुमचे धाडस आणि स्वप्ने याबाबत कधीही तडजाेड करू नका.
 
5) जेव्हा तुम्ही मनाचे ऐकता आणि तुम्ही निवडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्गावर चालत राहता तेव्हा तुम्हांला नैराश्य कधीच येत नाही उलट प्रेरणा मिळत राहते.
 
6) प्रत्येक गाेष्ट आणि प्रत्येक व्य्नती ही तुमच्या विचारांच्या आणि हेतूंच्या निमंत्रणामुळे तुमच्या आयुष्यात आलेले असतात.
 
7) आनंदामुळे माणसामध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण हाेत नाही तर कृतज्ञता व्य्नत केल्याने आनंद प्राप्त हाेताे. आत्ताच्या क्षणाबद्दल आणि घडामाेडींबद्दल तुम्ही कृतज्ञ नसाल तर तुम्ही कधीच आनंदी हाेऊ शकणार नाही आणि कधीही संतुष्ट हाेऊ शकणार नाही.
 
8) प्रत्येक चूक ही आपल्या आयुष्यातील शिक्षक असते. चूक ही खराेखच चूक ठरते जेव्हा आपण एकच चूक पुन्हा पुन्हा करत राहताे. त्यातून असे दिसते की, तुमचे काहीतरी चुकते आहे आणि चुकांमधून तुम्ही काहीच शिकत नाही.
 
9) सुस्पष्ट वैय्नितक ध्येय आणि दीर्घकालिन दृष्टी महत्त्वाची असते.
 
10) ज्यांचा जनमानसावर प्रभाव असताे त्यांचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करताे. परंतु शेवटी आपल्या अवतीभवती ज्या व्यक्ती असतात त्याच आपले भविष्य घडविण्यात महत्त्वाच्या ठरतात.विशेषतः पालक आणि अतिविशेष म्हणजे आई.
Powered By Sangraha 9.0