ओशाे - गीता-दर्शन

12 Aug 2025 13:56:25
 

Osho
मंगलाच्या दिशेने तुमची श्नती नियाेजित हाेईल. अन् दुसरा फायदा हा हाेईल की मंगलाच्या कामनेमुळे त्या दुसऱ्या माणसाच्या मनातही उत्तम प्रतिध्वनि उमटतील.ताेही तुमच्या मंगलाच्या भावनेने भरून जाईल.’ रस्त्यावरच्या अनाेळखी माणसालाही रामराम करण्याची प्रथा आपल्याकडे बनवण्यात आलेली आहे. जगात दुसरीकडे कुठेही अशी प्रथा बनवण्यात आलेली नाही.पाश्चात्य देशात जे गुड माॅर्निंग म्हटले जाते. ते अगदी साधारण आहे. सकाळ चांगली आहे, याचा अर्थ काही फारसा सघन नाही. पण हजाराे वर्षांच्या अनुभवानंतर या देशाने नमस्कारासाठी एक शब्द हुडकला हाेता ताे म्हणजे ‘राम’. रस्त्यावर काेणीतरी भेटताे, आपण म्हणताे ‘रामराम’.
 
त्या माणसाशी रामनामाचा तसा काहीच संबंध नाही. हे फ्नत रामाचे स्मरण आहे. ताे माणूस भेटल्याच्या निमित्ताने आपण प्रभूचे स्मरण केले. ज्यांना नमस्काराचे सार माहीत आहे ते फ्नत उच्चारण करून थांबणार नाहीत, तर त्या माणसातील रामाच्या प्रतिमेलाही ते पाहतील. अन् मगच ते पुढे जातील. त्या माणसाला पाहून त्यांनी ईश्वराचे स्मरण केले, त्या माणसाची हजेरी ही ईश्वरस्मरणाची घटनाबनली.ही संधी साेडली नाही. या निमित्ताने एक शुभ कामना निर्माण केली गेली, ईश्वराच्या स्मरणाची घटना निर्माण केली गेली. कदाचित ताे माणूस राम मानतही नसेल, ताे रामाला जागतही नसेल; पण प्रत्युत्तरादाखल ताेही रामराम म्हणेल. त्याच्याही मनातून चांगली भावना वर उसळून येईल आणि जुन्या गावांच्या रस्त्यावरून जाताना पंचवीस वेळातरी रामराम करायची वेळ येते.
Powered By Sangraha 9.0