वर्कआऊटमध्ये मदतरूप : कॅफिन अलर्टनेस, फाेकस आणि स्टॅमिना वाढवते. त्यामुळे वर्क आऊट दीर्घ काळापर्यंत आणि जास्त इंटेन्सिटीसह करण्यास मदत मिळते. वर्क आऊट आधी कॅफिन घेण्यात आल्यास फॅटला एनर्जीमध्ये बदलविण्याची प्रक्रिया लवकर हाेते, ज्यामुळे वेटलाॅस आणि बाॅडी लिन बनवण्यात मदत मिळते.वर्क आऊट केल्यानंतर मसल्सचे सगळे लहानमाेठे टिश्यू डॅमेज हाेऊन जातात. ज्याला प्राेटीन रिपेअर करते. प्राेटीनमुळे रिकव्हरी लवकर हाेऊन जाते. मसल बनविण्यासाठी देखील प्राेटीन आवश्यक असते. जिम, वेटलिफ्टिंगनंतर प्राेटीन घेतल्यास मसल-ग्राेथ त्वरेने हाेते. कॅफिन वर्कआऊट दरम्यान मेंटल क्लॅरिटी वाढवते, ज्यामुळे तुम्ही एक्सरसरीजवर चांगला प्रकारे फाेकस करू शकता.कसे बनवाल? प्राेटीन काॅफी बनविण्यासाठी एक कप ब्लॅक काॅफी घ्या. त्यात एक स्कुप प्राेटीन पवडर मिक्स करा. नॅचरल स्वीटनेस आणि थिकनेससाठी एक केळ टाका. अर्धा कप दूध किंवा प्लांट-बेस्ड दूध टाका. एक्स्ट्रा प्राेटीन आणि टेस्टसाठी 1-2 टीस्पून पीनट बटर टाकावे. 4-5 बर्फाचे तुकडे टाकावेत.त्यात चिमटी तिळाची पावडर किंवा काेकाे पावडर टाकू शकता.