जसे गिनीज बुकमध्ये नाव नाेंदवण्यासाठी लाेक कधी माेठा डाेसा तयार करतात, तर कधी भला माेठा लाडू. कदाचित ही बास्केट तयार करण्यामागेही अशीच काही तरी इच्छा असावी.पहिल्या नजरेत ही बिल्डिंग पाहून तुम्हाला असेच काही वाटेल. पण, असे काहीही नाही.विक्रम करण्यासाठी नव्हे तर लाेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही बिल्डिंग बनवली गेली आहे. अमेरिकेतील ओहियाे राज्यात असलेली ही बास्केट बिल्डिंग पाहून लाेक हिला जगातील सर्वांत माेठी बास्केट समजण्याची चूक करून बसतात.ही बिल्डिंग ओहियाेच्या नेपार्कमध्ये आहे. बास्केट बिल्डिंग लन्गबर्जर बास्केट कंपनीचे मुख्यालय आहे. ते 1997 मध्ये उघडले गेले.या बिल्डिंगचे डिझाइन असे करण्यात आले आहे की, दुरून पाहिल्यास ती ब्रेड ठेवावयाच्या बास्केटसारखी दिसून येते. सात मजली या बिल्डिंगमध्ये सुमारे 500 कर्मचारी काम करतात आणि ही शहराची शान आहे.