प्रवासात आराेग्य जपण्यासाठी काळजी घ्या

11 Aug 2025 14:07:59
 
 

journy 
 
प्रवासात अनेकांना चक्कर, उलटी, मळमळ इ. प्रकारचा त्रास सहन करावा लागताे. हा आपण प्रवासापूर्वी वा प्रवासात जे खाताे त्याचा परिणाम असताे. प्रवासात आराेग्य जपण्यासाठी काय खावे वा खाऊ नये याविषयी पाहू या.
 
 प्रवासात कधीही ब्रेड, ब्रेडचे पदार्थ खाऊ नका. ते किती शिळे आहेत हे कळायला मार्ग नसताे. शिळ्या ब्रेडमुळे डिसेंट्री हाेऊ शकते. सँडविच तर टाळावेच. काकडी, टाेमॅटाे हेही किती शिळे हे कळणे कठीण असते.
 
 प्रवासात कधीही अनधिकृत फेरीवाल्यांकडील पदार्थ खाऊ नका.आगगाडीला जाेडून कॅन्टीन असते.इथले पदार्थ वाजवी दरात मिळतात.ते चांगले असतात. ताजे व गरम असतात. ते खायला घ्या.
 
 प्रवासात कधीही आइस्क्रीम खाण्याचा माेह हाेऊ देऊ नका. आइस्क्रीम शिळे असेल तर पाेटदुखीचा त्रास उद्भवताे.
 
 प्रवासात थंडपेय घेत असाल तर अस्सल कंपनीची असल्याची खात्री करून घ्या. बनावट थंड पेये आराेग्याला हानिकारकअसतात.
 
 प्रवासात प्रमाणित कंपनीचे मिनरल वाॅटरच प्यावे. बाटलीचे सील व तारीख पाहून घ्यावी. श्नयताे चहा पिऊनच तहान भागवावी.
 
 स्वस्त दरात विकायला आलेली फळे जास्त पिकलेली असतील तर घेऊ नयेत. त्यामुळे अपचन, उलट्यांना आमंत्रण दिल्यासारखे हाेते.
 
 बिस्किटे विकत घेताना ती अधिकृत कंपनीचीच असल्याची खात्री करून घ्या. सुटी बिस्किटे, स्थानिक कंपन्यांची बिस्किटे चांगली असतीलच याची खात्री नसते.
 
 तळलेले पदार्थ फार खाऊ नयेत. ते पुन्हा पुन्हा तळलेले असतील तर ते खाल्ल्यामुळे पित्त, अपचन, उलट्या हाेतात.
 
Powered By Sangraha 9.0