‌‘जग्गू आणि ज्युलिएट‌’ला उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय पुरस्कार

11 Aug 2025 14:45:21
 
pu
 
पुणे, 9 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
पुनीत बालन स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‌‘जग्गू आणि ज्युलिएट‌’ या चित्रपटाला 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2025 च्या पुरस्कार सोहळ्यात द्वितीय क्रमाकांचा उत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. याशिवाय चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यासह अन्य सहायकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. उत्तराखंडच्या निर्सगरम्य परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामधील अमेय वाघ (जग्गू) आणि वैदही परशुरामी (ज्युलिएट) यांची फुललेली प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
 
pu 
मुंबईत झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2024 व 2025 च्या उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात 2025च्या उत्कृष्ट पुरस्कारामध्ये पुनीत बालन स्टुडिओजच्या ‌‘जग्गू आणि ज्युलिएट‌’ चित्रपटाला द्वितीय क्रमांक मिळाला.
 
या चित्रपटातील प्रमुख कलाकार अमेय वाघ याला उत्कृष्ट अभिनेता, तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांना उत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक मिळाला; तसेच याच चित्रपटातील इतरही सहकलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुनीत बालन स्टुडिओच्या माध्यमातून मुळशी पॅटर्न, रानटी, जग्गू आणि ज्युलिएट अशा काही दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. तीन वर्षांपूर्वी त्यांचा ‌‘जग्गू आणि ज्युलियट‌’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
 
भविष्यात अशाच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणार
 महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव 2025 च्या पुरस्कार सोहळ्यात जग्गू आणि ज्युलिएट या चित्रपटाला द्वितीय क्रमाकांचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो. याशिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता व इतर सहायकांना विविध पुरस्कार मिळाले त्यांचेही मनः पूर्वक अभिनंदन. पुनीत बालन स्टुडिओज निर्मित सर्वच चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, याबाबत मी प्रेक्षकांचाही आभारी असून, भविष्यात अशाच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांचे प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करेन.
 
 -पुनीत बालन (निर्माते, पुनीत बालन स्टुडिओज)
 
pu
Powered By Sangraha 9.0