वसईमध्ये स्मशानभूमीत लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य लावल्याच्या मुद्द्यावरून विराेध दर्शवण्यात आल्यानंतर महापालिकेने संबंधित अभियंत्याला कारणे दाखवा नाेटीस बजावली असून, तपासाचे आदेश दिले आहेत.वसई-वेस्ट वाॅर्ड कमिटी ‘आय’ (वसई गाव) अंतर्गत बेणेपट्टी भागातील दुर्दशा झालेल्या स्मशानभूमीच्या विकासासाठी महापालिकेने विविध प्रकारच्या खेळाचे 15 प्रकारचे साहित्यप्रकार बसवले हाेते. नागरिकांनी आणि येथील राजकीय पक्षांनी या गाेष्टीला विराेध दर्शवला हाेता.स्मशानभूमीत खेळाचे साहित्य बसवण्याचे काम लाेकांच्या भावना दुखावणारे असल्याची कबुली देत सहायक आयुक्त संजय हरवाडे यांनी याबाबत तपासाचे आदेश दिले आहेत. आयुक्त, सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांना काेणालाही याबाबत माहिती नव्हती, असा दावा करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही या असंवेदनशील कामाबाबत काेणालाही माफ करणार नाही. तपासात दाेषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सहायक आयुक्तांनी उद्यान विभागाच्या संबंधित अभियंत्यांना कारणे दाखवा नाेटीस पाठवली आहे.दरम्यान, काँग्रेसने संबंधित अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे.