कर्मयाेग आचरताना मनास शांती कशी प्राप्त हाेईल हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण व ज्ञानेश्वर करीत आहेत. कर्म करताना थाेडे जरी फळ प्राप्त झाले तरी ते आपल्या वाट्यास न घेता ईश्वराला अर्पण करावे.मनाची अशी अवस्था हाेण्यासाठी चित्ताची समता प्राप्त व्हावी लागते. या अवस्थेलाच सज्जन लाेक याेगस्थिती म्हणून उल्लेखितात. मनाचे हे समत्व कसे प्राप्त हाेणार? पाप, पुण्य, सुख, दु:ख, यशापयश यांत न सापडता चित्त या सर्वांहून विरहित ठेवणे म्हणजे समत्व आणि हेच याेगबुद्धीचे मर्म आहे. कारण या याेगाने मन व बुद्धी यांचे ऐक्य हाेते. नुसते कर्म करणे हे तसे कमी दर्जाचे आहे.पण याेगमुक्त हाेऊन निष्काम कर्म करणे हे श्रेष्ठ असल्यामुळे या निष्काम कर्मयाेगाचा तू अवलंबकर. कर्मफळाची इच्छा साेडून दे.
अशा कर्मयाेगाच्या ठिकाणी जे स्थिर हाेतात, ते संसारसागर तरून जातात, कारण हा लाेक व परलाेक यांचा संबंध या बुद्धियाेगानेच संपताे.याेगमुक्त हाेऊन कर्मे केल्यास फळाची प्राप्ती झाली तरी त्यांची इच्छा मनात सल्यामुळे संसारातील जाणेयेणे संपते. ते याेगमुक्त लाेक दु:खरहित व पतनरहित अशा परमपदाला जातात.आणि अर्जुना,अशी याेगयुक्त अवस्था तू शाेकमुक्त झालास तरच हाेईल व तुझे मन वैराग्यशील बनेल. वैराग्यामुळे शुद्ध व तर्कातीत असे आत्मज्ञान प्राप्त हाेऊन विषयसुखाची इच्छा नाहीशी हाेईल. काही जाणण्याची, काही स्मरण्याची इच्छाही उरणार नाही. कारण इंद्रियांच्या संगतीत नाना विषयांत धावणारी आपली मती आत्मरूपात स्थिर हाेते. अशी बुद्धी स्थिर झाल्यावर अर्जुना, तुला याेगस्थिती प्राप्त हाेईल. म्हणून शाेकमाेहापासून तू आपली बुद्धी वेगळी कर.