पुण्यातील वाहतूक काेंडी साेडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करा

01 Aug 2025 12:54:26
 
 

pawar 
पुणे आणि परिसरातील वाहतूक काेंडी साेडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 60 (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.548 डी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.पुणे महानगर आणि औद्याेगिक परिसरातील वाढती वाहतूक काेंडी लक्षात घेता पुणे परिसरातील नाशिक फाटा ते खेड रस्ता सहा लेनचा करावा. हडपसर ते यवत या विद्यमान चार लेन रस्त्याचे सहा लेनमध्ये रूपांतर करावे. तसेच, तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा सध्या दाेन लेन असलेला मार्ग सहा लेन करण्याची आवश्यकता आहे.
 
या तिन्ही मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा स्थितीत या महामार्गावर तत्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे. जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड काॅरिडाॅरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध हाेऊ शकेल, असे पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे.हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जाेडले गेलेले असल्यामुळे, बाह्य भागातील वाहने शहरात प्रवेश करताना वाहतूक काेंडी निर्माण हाेते.त्यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययाेजना करण्याची गरज आहे. तसेच, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हाय वे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयाेग हाेईल. या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती पवार यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0