मी असं ऐकलं आहे की एकदा एक माणूस येशूंकडे आला.खेड्यातला चारचाैघासारखाच ताे एक शेतकरी हाेता. बैलांना बैलगाडीला जुंपून शिव्या देण्यात हा माेठा पटाईत. येशू ख्रिस्त गावातल्या रस्त्यााने जात आहेत, हा माणूस गाडीला बैल जुंपून, माेठ्या गलिच्छ शिव्या बैलांना देत चालला आहे. त्याचे शिव्या देणे अशा काही विशिष्ट प्रकारे चालू आहे की त्यांत त्याला माेठी गाेडी, माेठा रस येत आहे असे दिसते. येशू त्याला थांबवून म्हणतात, ‘ए वेड्या! तू हे काय करताेयस, तुला काही कळतंय काय?’शेतकरी म्हणाला, ‘बैल मला उलट्या शिव्या देणार थाेडाच? ताे माझे काय वाकडे करील?’ या माणसाचं हे म्हणणं ठीक आहे. आपलेही गणित बराेबरच असेच असते.