नवी मुंबईत कचरा संकलनाला गती

01 Aug 2025 13:16:57
 
 

navi Mumbai 
कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च 2015 ते मार्च 2022 पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराला काम दिले हाेते. आता नव्या ठेकेदाराला नऊ वर्षांचा ठेका देण्यात आला आहे.पालिकेने नव्या निविदेत कचरा वर्गीकरणाची व्याप्तीही वाढवली आहे. विविध पद्धतीचा कचरा वेगळा करण्याचे लक्ष्य आहे.नवीन कचरा संकलन ठेक्याच्या निविदेनुसार शहरातील साेसायट्यांना ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी ठेकेदाराकडून 24 हजार कुंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांनीही स्वच्छतेबाबत व कचरा संकलनाबाबत याेग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.नवी मुंबई महापालिकेकडून गेली दाेन वर्षे सातत्याने कचरा वाहतूक व संकलन कामाला मुदतवाढ दिली जात हाेती.
 
परंतु, 26 जानेवारीपासून बहुचर्चित 934 काेटी खर्चाच्या कचरा वाहतूक व संकलन कामाचा श्रीगणेशा झाल्यानंतर या नव्या कामाच्या कार्यादेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. ठेकेदाराकडून शहरात एकूण 24 हजार कचराकुंड्यांचे वाटप लवकरच पूर्ण हाेणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी दिली.दिघा व काेपरखैरणे विभागातून ओला व सुका कचऱ्याच्या कचराकुंड्या वाटपाला सुरुवात झाली आहे. पालिका इतिहासात प्रथमच ई कचरा वाहतुकीचाही श्रीगणेशा झाला आहे. शहरात 40 ई वाहनांद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे. पालिकेने शहर स्वच्छतेबराेबरच कचरा वर्गीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पालिकेने
Powered By Sangraha 9.0