नाशिक शहरात आपत्कालीन स्थिती हाताळण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरी संरक्षण दलाने उपलब्ध केलेले 13 भाेंगे आपत्कालीन स्थितीत सतर्कतेचा इशारा देण्यासाठी महापालिका मुख्यालयासह विविध भागांत बसवण्यात येणार आहेत.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये दाखल हाेणाऱ्या लाखाे भाविकांना सूचना देण्यासाठी या व्यवस्थेचा उपयाेग हाेणार आहे.पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर हवाई हल्ल्यांचा संभाव्य धाेका लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा देण्यासाठी भाेंगे बसवण्याचा विषय पुढे आला हाेता. आपत्कालीन परिस्थितीत इशारा देण्यासाठी विविध शासकीय इमारती, अग्निशमन केंद्र व शाळा इमारतींवर भाेंगे बसवण्याचे निर्देश गृह विभागाने दिले हाेते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पालिकेला पत्राद्वारे सूचित केले आहे.नागरी संरक्षण दलाने 13 भाेंगे पालिकेला उपलब्ध केले. परंतु, हे काम पुढे सरकले नाही. पालिकेच्या आढावा बैठकीत आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी भाेंगे बसवण्याची कार्यवाही वेळेत हाेणे आवश्यक असल्याचसूचित केले. भाेंगे बसवण्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
बांधकाम, विद्युत, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वयाने भाेंगे बसवण्याचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.अपवादात्मक परिस्थितीत जागाउपलब्ध हाेत नसल्यास पर्यायी जागा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.संपूर्ण शहरात आवाज पाेहाेचेल या दृष्टिकाेनातून नागरी संरक्षण दलाने पालिकेला एकूण 13 भाेंगे उपलब्ध केले आहेत. यातील काही भाेंग्यांची क्षमता पावणेचार कि.मी., तर काही भाेंग्यांची क्षमता सात कि.मी. इतकी आहे. या माध्यमातून संपूर्ण शहरात आपत्कालीन परिस्थितीत इशारा देणे शक्य हाेईल. या बाबतची माहिती नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अरूण जगताप यांनी दिली.पालिकेने भाेंगे बसविण्यासाठी काही जागा निश्चित केल्या आहेत. आगामी कुंभमेळ्यात गर्दीच्या व्यवस्थापनाचे माेठे आव्हान आहे. त्या दृष्टीने विविध पातळीवर नियाेजन प्रगतिपथावर आहे. कुंभमेळ्यात भाविकांना सूचना वा सतर्कतेचा इशारा देण्यासाठी ही व्यवस्था उपयाेगी ठरणार आहे.