जपानच्या राजदूतांनी राज्यपालांची भेट घेतली

01 Aug 2025 13:21:44
 

Japan 
 
मुंबई भेटीवर आलेले जपानचे भारतातील राजदूत किची ओनाे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली.भारत व जपानचे सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय संबंध, जपान-भारत शैक्षणिक सहकार्य, पर्यटन, वस्त्राेद्याेग, कृषी, क्रीडा, शिक्षण, काैशल्य आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी काेजी, भारतातील जपानी दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिराे, जपानी दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नाेरिफुमी, उप-वाणिज्य दूत निशियाे रियाे आदी उपस्थित हाेते. वस्त्राेद्याेग क्षेत्रात जपानने भारताला सहकार्य केले, तर त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना हाेईल. या संदर्भात वस्त्राेद्याेग क्षेत्राशी निगडित विक्रेता-ग्राहक परिषदेचे आयाेजन केले जावे. रत्न व आभूषण, तसेच हिरे व्यापार क्षेत्रातही भारतीय उत्पादने जपानी नागरिकांच्या पसंतीस उतरतील, असे राज्यपालांनी सांगितले. भारतातील युवकांना जपानी विद्यापीठांबद्दल फारशी माहिती नाही. भारतातून अवघे 1600 विद्यार्थी जपानमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.महाराष्ट्रातील विद्यापीठांत जपानी भाषांचे वर्ग सुरू करण्याच्या कार्यात सर्वताेपरी सहकार्य करण्यात येईल, असे किची ओनाे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0