अमेरिकेच्या मालकीच्या या बेटावर 1946 च्या सुमारांस अणुचाचण्या घेण्यात आल्या हाेत्या. हे बेट अतिशय सुंदर आहे. मऊशार वाळू, नितळ निळे पाणी, पाम वृक्ष यामुळे इथला निसर्ग बहरून गेला आहे. मात्र अणुचाचण्यांमुळे या ठिकाणी तीव्र स्वरुपाचे उत्सर्जन हाेत असल्याने याठिकाणी गेल्यास कर्कराेग हाेण्याचा धाेका संभवताे.