देशातील सर्वाेत्कृष्ट बिझनेस स्कूल, त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवत आहेत.तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की यामुळे उच्च दर्जाचे महिला व्यवस्थापक (मॅनेजर) व नेते (लीडर) घडतील आणि विविधतेला प्राेत्साहन मिळेल, उद्याेग क्षेत्राला ज्याची गरज आहे.देशातील सहा नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्थांमध्ये (आयआयएम) यंदाच्या बॅचमध्ये 9% अधिक विद्यार्थिनी दाखल झाल्या आहेत. ही नवीन बॅच म्हणजे क्लास ऑफ 2027 असून, या सर्व संस्थांनी यंदाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. आयआयएम इंदूरमध्ये,संस्थेच्या 29 वर्षांच्या इतिहासात यंदा सर्वाधिक म्हणजे 53.79% विद्यार्थिनीं आहेत. तर, आयआयएम अहमदाबादमध्ये महिलांचे प्रमाण 30.84% आहे, जे मागील चार वर्षांतील सर्वाधिक आहे.
2025च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये, वेगळेपणा असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यात विद्यार्थिनींना आणि अभियांत्रिकी क्षेत्राबाहेरच्या विद्यार्थिनींना प्राधान्य दिले गेले आहे.या राष्ट्रीय संस्थांमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्याचप्रमाणे, अनेक कंपन्याही व्यवस्थापन व निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, विविधतेचा विचार करत आहेत.नारायणन रामास्वामी, (भारताचे शिक्षण व काैशल्य विकास प्रमुख) म्हणाले, ‘विद्यार्थिनींना या ‘बी-स्कूल’मध्ये प्रवेश मिळणे, हे शिक्षण संस्था आणि उद्याेग क्षेत्रासाठीही फायदेशीर ठरेल. अभ्यासक्रम, अध्यापन आणि उद्याेग क्षेत्रांमध्ये त्यामुळे चांगले बदल दिसतील.’