पठाणाचा अभिमान गळाला

    09-Jul-2025
Total Views |
 
 

pathan 
 
माणूस कुठे काेणत्या देशात, प्रांतात, भाषेत, धर्मात जन्म घेणार हे त्याच्या हातात नसतं.माणसाच्या लाखाे वर्षांच्या इतिहासात गेली काही हजार वर्षं धर्म नावाची भानगड तयार झालेली आहे.त्यातही सुरुवातीपासून आतापर्यंत एकाच धर्माचे राहिले आहेत, असे समुदाय कमीच आहेत. राजाचा धर्म ताे प्रजेचा धर्म ठरत असल्याने बहुतेकांचे पूर्वज वेगवेगळ्या धर्मांच्या फेऱ्या करून आल्या आहेत. तरीही आपण आज जिथे आहाेत, त्या धर्माचा, त्या ओळखीचा माणसं एकदम अभिमान वगैरे बाळगू लागतात. श्रेष्ठत्वाची खाेटी भावना अंगी बाणवण्यासाठी ताैलनिक अभ्यास करावा लागत नाही. शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानातला पठाण.इरफान पठाण हा भारतातला पठाण. शाहिद आफ्रिदी हा स्वत:ला मूळ पठाण मानताे आणि इरफानला भारतीय पठाण असल्यामुळे बनावट पठाण मानताे.मुळात भारत पाकिस्तान सामना म्हटला की मैदानात खुन्नस असतेच. पण तिच्याही पलीकडे ही शाहिदची पठाणी खुन्नस असायची. मैदानात ताे बॅटिंग करत असेल आणि इरफान बाेलिंग करत असेल, तर ते दाेन पठाणांमधलं युद्ध असायचं शाहिदसाठी. ताे संधी मिळेल तिथे इरफानला