सहवर्धन प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण

    09-Jul-2025
Total Views |
 
 sah
पुणे, 8 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) 
 
पुण्यातील हिंगणे खुर्द भागातील सुदत्त संकुल सोसायटीतील सहवर्धन प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षांपासून तळजाई टेकडीवर अडीच एकर भागात वावळ, मोई, पांगारा, काटेसावर अशा स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यांचा उपयोग टेकडी परिसरातील पशुपक्षी, कीटक, फुलपाखरे, मधमाश्या याशिवाय मानवी जीवनालाही होऊ शकतो. तळजाई टेकडीवरील झाडांची ओळख व महत्त्व याची माहिती सहवर्धन प्रतिष्ठानचे प्रमुख अमेय गोडसे व पारस वनकुद्रे यांनी दिली.
 
या ग्रुपला सिंहगड भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीकांत केंढे, भार्गव अष्टेकर, भूषण लोटलीकर, सुरेंद्र खोपटकर, अमोल रंधाव, गौरव मणियार व इतर मित्रमंडळांची मोलाची साथ असते. या गु्रपच्या वतीने रक्तदान शिबिर, प्लॅस्टिक कचरा रिसायकलिंग, गणपती काळात शाडूमाती रिसायकलिंगला देणे, कापडी पिशव्यांचे वाटप आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात.