उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीडमध्ये टाटा टेक्नाॅलाॅजीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या सेंटर फाॅर इन्व्हेंशन, इनाेव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात सीट्रीपल आयटीसाठी बीड एमआयडीसी औद्याेगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक तीनमधील चार हजार चाैरस मीटर जागा; तसेच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतला आहे.या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील युवकांना औद्याेगिक प्रशिक्षण, तांत्रिक काैशल्य विकासाच्या माध्यमातून उद्याेगक्षम बनवणे, राेजगार, स्वयंराेजगाराची संधी उपलब्ध हाेण्याचा मार्ग खुला झाला आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालक मंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण बैठका घेऊन सीट्रीपल आयटी उभारणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे.
एमआयडीसीच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे केंद्रासंदर्भातील त्रिपक्षीय करार आणि प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच हाेईल, अशी अपेक्षा आहे.गडचिराेलीत गाेंडवाना विद्यापीठात नगरपरिषदेतर्फे टाटा टेक्नाॅलाॅजीच्या माध्यमातून सीट्रीपल आयटी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरीत औद्याेगिक क्षेत्रात आयटी सुरू करण्यासाठी एमआयडीसीला याेजना अभिकर्ता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिर्डी येथील सीट्रिपल आयटीसाठी एमआयडीसीने निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याचधर्तीवर बीडच्या सीट्रीपल आयटीसाठीही एमआयडीसीने निधी उपलब्ध करून देण्याचा; तसेच याेजना अभिकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
एमआयडीसीचा हा निर्णय बीड जिल्ह्यातील युवकांना राेजगार, स्वयंराेजगाराची संधी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या नव्या सेंटरमधून दरवर्षी 7 हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.यामुळे बीड जिल्ह्यात उद्याेगपूरक वातावरण निर्माण हाेण्यास मदत हाेईल.सीआयआयआयटीच्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षणाचा खर्च टाटा टेक्नाॅलाॅजी उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च टाटा टेक्नाॅलाॅजी आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी पन्नास ट्न्नयांप्रमाणे विभागून उचलणार आहेत.