स्वीस बँकेबराेबरच मंदिरांतील पैसाही देशाच्या तिजाेरीत यावा

09 Jul 2025 23:15:45
 
 
 
Bank
 
काही वर्षांपूर्वी केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरातून सहा लाख काेटींचा खजिना हाती लागला हाेता. जमिनीच्या वीस फूट खाली सहा भुयारे हाेती. त्यातून कित्येक टन साेन्याच्या मुद्रा, दागिने आणि थैल्या भरून हिरे-माेती हाती लागले हाेते.देशातून एवढ्या माेठ्या प्रमाणात संपत्ती हाती लागण्याची अशी ही पहिलीच घटना हाेती.संपत्ती मंदिराचीच मिळकत मंदिरातून मिळालेल्या अब्जावधी रुपयांची संपत्ती राज्याच्या तिजाेरीत जमा करून गरिबांचे कल्याण करण्यासाठी त्याचा सदुपयाेग करायला हवा हाेता. त्याऐवजी ती संपत्ती मंदिराचीच मिळकत असल्याचे जाहीर करण्यात आले.खजिना न वापरल्यास वाया जाईल या देशामध्ये भक्त गरीब आणि देव श्रीमंत आहेत. काेट्यवधी रुपयांच्या डाेंगरावर मंदिरे, पुजारी, संत बसले आहेत. थाेडा विचार करा, काही वर्षांपूर्वी केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरातून सहा लाख काेटींचा खजिना हाती लागला हाेता.
 
जमिनीच्या वीस फूट खाली सहा भुयारे हाेती. त्यातून कित्येक टन साेन्याच्या मुद्रा, दागिने आणि थैल्या भरून हिरे-माेती हाती लागले हाेते.देशातून एवढ्या माेठ्या प्रमाणात संपत्ती हाती लागण्याची अशी ही पहिलीच घटना हाेती.संपत्ती मंदिराचीच मिळकत मंदिरातून मिळालेल्या अब्जावधी रुपयांची संपत्ती राज्याच्या तिजाेरीत जमा करून गरिबांचे कल्याण करण्यासाठी त्याचा सदुपयाेग करायला हवा हाेता. त्याऐवजी ती संपत्ती मंदिराचीच मिळकत असल्याचे जाहीर करण्यात आले.खजिना न वापरल्यास वाया जाईल या देशामध्ये भक्त गरीब आणि देव श्रीमंत आहेत. काेट्यवधी रुपयांच्या डाेंगरावर मंदिरे, पुजारी, संत बसले आहेत. थाेडा विचार करा, झाल्यास ताे संपत्तीचा श्रेष्ठाेत्तम उपयाेग मानला पाहिजे. अन्यथा ती डेड इन्व्हेस्टमेंट ठरेल.गरिबासांठी वापरावी मंदिरातील संपत्ती देशातील अनेक भागांत अताेनात गरिबी आहे.
 
कित्येक भागांत लाेकांना अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या मूलभूत गाेष्टीही मिळत नाहीत.आजही अनेक लाेक गरिबीत खितपत पडले आहेत. या लाेकांच्या हितासाठी देवळांमध्ये पडून राहिलेला अब्जावधी रुपयांचा साठा वापरता येईल.दुःख-वेदना दूर करण्यासाठी दानाचा उपयाेग व्हावा आजही देवळाच्या, देवाच्या नावाने अनेक लाेक माेठे दान- याेगदान देत असतात. त्यांचा उपयाेग शाळा, महाविद्यालये, रुग्णालयाच्या निर्मितीसाठी वापरणे गरजेचे आहे. माणसाच्या श्रद्धेला एनकॅश करून गाेळा केलेले अब्जावधी रुपये माणसाचे दुःख-वेदना दूर करण्यासाठी उपयाेगी येऊ शकतात. एखाद्या आदिवासी भागात काॅलेज सुरू करता येतील. त्यांनाही चांगले शिक्षण मिळू शकेल. आदिवासींची मुलेही डाॅ्नटर, इंजिनीअर हाेऊ शकतील.
 
स्वीस बँकेतील काळा पैसाही लाेकहितासाठी वापरावा या देशाच्या भ्रष्ट राजकारण्यांनी स्वीस बँकेमध्ये 400 लाख काेटी रुपयांचा काळा पैसा लपवून ठेवला आहे. हा पैसा देशाच्या तिजाेरीत जमा व्हायला पाहिजे. त्याचाही उपयाेग लाेकहितासाठी, समाजहितासाठी व्हायला पाहिजेबाबा लाेकांची बिनहिशेबी संपत्ती सध्या समाजात काही लाेकांवर बाबा, संत लाेकांचा खूपच प्रभाव दिसताे. ते श्रद्धने, अंधश्रद्धेने या बाबा लाेकांना खूप दान देत असतात. त्यामुळे या बाबा-संत लाेकांकडे हजाराे काेटींची सपंत्ती साठत जाते. सत्य साईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खाेलीतून 1.30 लाख काेटी रुपयांची बिनहिशेबी संपत्ती मिळाली हाेती, हे अनेकांना आठवत असेलच. त्यामध्ये 307 किलाे चांदी आणि 98 किलाे साेने सापडले हाेते. सत्य साईबाबांनी मानवतेसाठी अनेक कामे केली.
 
त्यामुळे त्यांच्या उद्देशांबद्दल शंका घेता येणार नाही, असेही त्यांच्या भक्तांचे मत आहे.पण तरीही प्रश्न पडताे, की त्यांचा सगळाच हिशेब जर सरळ असेल तर हे पैसे खाेलीत लपवून ठेवण्याची गरज का पडली असावी? या पैशांतून थाेडीअधिक मानवतावादी कामे केली असती तर त्यांच्या यशाेमुकुटात आणखी एक तुरा खाेवला गेला असता.तात्पर्य एवढेच आहे, की देशाच्या शेकडाे देवळांतील गुप्त भुयारांमध्ये स्वीस बँकेसारखीच बिनहिशेबी संपत्ती पडून आहे. ही सर्वच्या सर्व संपत्ती देशाच्या तिजाेरीत जमा करून तिचा देशाच्या विकासासाठी सदुपयाेग केला पाहिजे.तुम्हाला काय वाटते...?
Powered By Sangraha 9.0