पंखा-एसी नाही, घरात तरीही थंड वातावरण

    08-Jul-2025
Total Views |
 

thoughts 
 
आपल्याकडे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू साधारणपणे चार असतात; पण अलीकडे संपूर्ण जगाचेच वातावरण जलद गतीने बदलत चालले आहे. निसर्गाबराेबर मानवाने केलेल्या छेडछाडीचे परिणाम संपूर्ण जीवसृष्टीला भाेगावे लागत असून, तीव्र उन्हाळ्याचा त्रास सगळ्यांनाच हाेताे आहे. सूर्याच्या तप्त किरणांपासून बचाव करण्यासाठी पंखा, कुलर किंवा एसीचा वापर आता अटळ झाला आहे.या सर्व प्रकारांना कंटाळलेला आणि निसर्गाच्या जवळ असलेला एक वर्ग नैसर्गिकरीत्या या वातावरणातील फरकापासून दूर राहण्यासाठी काही ना काही शाेध करीत असताे आणि यातूनच मातीच्या घरात राहण्याची संकल्पना पुन्हा एकदा पुढे येऊ लागली आहे. खरे तर गरीब किंवा मध्यमवर्गीय लाेकांची घरे माती आणि शेणाने बनवलेली असतात; पण ती खराेखरच थंड असतात. या घरामध्ये उन्हाळा किंवा थंडी अधिक जाणवत नाही आणि हिटर किंवा एसीचा खर्चही त्यांना करावा लागत नाही.
 
‘एसी’सारखा माेठा खर्च करणे त्यांना अर्थातच परवडणारे नाही. यामुळेच साेशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल हाेताे आहे. दिल्लीतील असह्य उन्हाळ्यापासून दूर राहण्यासाठी आणि थंड वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी मातीच्या घरांचे आकर्षण लाेकांमध्ये वाढताना यात दिसत आहे. या घरातील एक वेगळी साेय अशी आहे की, बाहेरची हवा या मातीच्या घरांच्या भिंतीवर आदळून मगच आत येते आणि त्यामुळे घरातील तापमान थंड राहते.अशीच व्यवस्था हिवाळ्यात घरातील तापमान उष्ण राहण्यासाठी देखील करण्यात आली आहे.पर्यावरणाची जाणीव, पैशांची बचत आणि कार्बनचे उत्सर्जन अशा अनेक गाेष्टींचा विचार करून करण्यात आलेली ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लाेकप्रिय हाेऊ पाहत आहे.