आताच्या डिजिटल युगात प्रत्येकजण घराबाहेर पडून नाेकरी-धंदा करताेय; पण शेती करताना आमचा तरुण दिसत नाही. आता दिसताहेत ते त्या तरुणाचे आईवडील; पण आईवडिलांनंतर शेतीचे काय हाेणार. खरेतर शेती टिकली तरच आपण टिकणार आहाेत. आणि अशा या धाकधुकीच्या जीवनात जे शेतकरी शेतीत नवीन प्रयाेग करून शेती करताहेत अशा शेतकऱ्यांचा शेतीत नाविण्यपूर्ण बदल करून अधिक उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून करण्यात येताेय, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी पाली, मराठा समाज हाॅल येथे झालेल्या शेतकरी सत्कारप्रसंगी काढले.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठीपत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, मराठी पत्रकार परिषदेचे काेकण सचिव मनाेज खांबे, जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गाेपाळे, कार्याध्यक्ष संजय माेहिते, उपाध्यक्ष अनिल माेरे, उपाध्यक्ष माेहन जाधव, पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष विजय माेकल, भाजप नेते प्रकाश देसाई, राजेश मापारा, सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, सुधागड तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम, पाली पाेलीस निरीक्षक सरिता चव्हाण, ‘राष्ट्रवादी’चे तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, रिपाइं तालुकाध्यक्ष राहुलभाई साेनवले, मेघा पाईपचे विजय संकपाल, शिवसेनेचे अनुपम कुलकर्णी, सचिन जवके,बाैद्धजन पंचायतीचे अध्यक्ष दीपक पवार, सुधागड प्रेस क्लब अध्यक्ष विनाेद भाेईर, कार्याध्यक्ष रवींद्रनाथ ओव्हाळ, सचिव निशांत पवार, खजिनदार परेश शिंदे, प्रत्येक तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष तसेच रायगड प्रेस व सुधागड प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते.