पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची श्नती द्यावी. सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी. बळीराजाला सुखी-समाधानी करण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाचरणी घातले.आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक; तसेच मानाचे वारकरी दांपत्य कैलास दामू उगले-कल्पना उगले यांच्यासमवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पालक मंत्री जयकुमार गाेरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंहमाेहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र काेठे, आमदार अभिजित पाटील, विभागीय आयु्नत चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिरसमितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित हाेते.
शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी कैलास उगले आणि कल्पना उगले (मु. पाे. जातेगाव, ता. नांदगाव, जि.नाशिक) या वारकरी दांपत्याचा मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापूजेनंतर सन्मान करण्यात आला; तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना माेफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबाेधन करणाऱ्या दिंड्यांचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक-श्री संत राेहिदास दिंडी क्रमांक 13, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी साेहळा. द्वितीय क्रमांक-श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक 19, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साेहळा. तृतीय क्रमांक-श्री गुरू बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक 23, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साेहळा या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला.