दातांना कीड लागणं ही एक सामान्य समस्या आहे. ओरल हायजिन खराब असणं, खाण्यापिण्यातील अनियमितता इतर काही कारणामुळे दातांना कीड लागते.दातांच्या समस्येमुळे फक्त दात कीडत नाहीत तर वेदनाही जाणवतात. दातांमध्ये वेदना जाणवणं अनेकदा असहाय्य हाेतं.दातांतील कीड काढून टाकण्यासाठी काही साेपे उपाय करू शकता, ज्यामुळे कॅव्हिटीज दूर हटवण्यास मदत हाेईल आणि वेदना पासूनही आराम मिळेल. नारळाचे तेल आणि लवंग दातांच्या समस्या टाळण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.नारळाच्या तेलाचा वापर करून ऑईल पुलिंग केल्यास दात स्वच्छ हाेण्यास मदत हाेते. ताेंडातील बॅक्टेरियाज कमी हाेतात. यातील नॅच्युरल एंटीमायक्राेबियल गुणधर्म दातांना चांगला परिणाम दर्शवतात.
ज्यामुळे आराेग्य चांगले राहण्यास मदत हाेते. या तेलामुळे दातांवर जमा झालेले प्लेक, टार्टर नष्ट हाेण्यास मदत हाेते. हा उपाय घरच्याघरी करण्यासाठी 2 चमचे नारळाच्या तेलात 2 ते 3 थेंब लवंगाचे तेल घाला. एका स्वच्छ वाटीत नारळाचे तेल काढून घ्या. यात लवंगाचे तेल व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण दात आणि हिरड्यांना लावा.कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तसंच लावून ठेवा. त्यानंतर ताेंड स्वच्छ करून पाण्याने गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसभरातून 2 वेळा करा.ज्यामुळे दातांचे आराेग्य चांगले राहण्यास मदत हाेईल.
नारळाच्या तेलात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे ताेंडातील बॅक्टेरिया मारण्यास मदत हाेते. लवंगाचे तेल वेदना निवारक आणि एंटी सेप्टीक गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे दातांतील संक्रमण कमी हाेण्यास मदत हाेते.लवंगात एंटी-सेप्टीक गुण असतात. ज्यामुळे दातांतील संक्रमण कमी हाेण्यास मदत हाेते. हा उपाय करताना लक्षात घ्या की, तुम्हाला नारळाचे तेल किंवा लवंगाच्या तेलाची कसलीही एलर्जी हाेणार नाही. दातांमध्ये वेदना जाणवत असतील तर नेहमीच वैद्यकीय मदत घ्या. दातांमध्ये कीड लागणं हे ओरल हायजिनशी संबंधित आहे. रेग्युलर ब्रश करणं, फ्लाेसिंग करणं, यामुळे समस्या टाळण्याास मदत हाेते.