महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरणरंजन नाही; ताे आपला नैतिक मार्गदर्शक आहे

    08-Jul-2025
Total Views |
 

CM 
 
महाराष्ट्राचा इतिहास गाैरवशाली आहे आणि ती एक जबाबदारीही आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्याेती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे थेट वशंज नसलाे तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहाेत.या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडवले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरणरंजन नाही.ताे आपला नैतिक मार्गदर्शक आहे. आपण काेण आहाेत, हे समजून घेऊन आपल्याला काय घडवायचे आहे, ते ठरवणे हाच महाराष्ट्रधर्म आहे, असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रधर्म विशेष पाॅडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला.संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. सदानंद माेरे यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी 2014 ते 19 या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बाेलताेय’ हा टीव्ही शाे केला हाेता. आता नवमाध्यमांत लाेकप्रिय पाॅडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.या पाॅडकस्ट मालिकेचा प्रारंभ महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी या विषयापासून झाला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रधर्म या विशेष पाॅडकास्ट मालिकेचे हे पहिले चरण हाेते.महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगाने त्यांनी यात मांडणी केली.ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत, फुल्यांच्या साहसापासून, डाॅ.आंबेडकरांच्या दृष्टिकाेनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहिली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या पाॅडकास्टला माेठा प्रतिसाद लाभला.